• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

मुक्ताईनगरात दोन महिलांच्या विनयभंगाच्या तक्रारी ; आरोपी नाथाभाऊ व आमदार पाटलांचे समर्थक !

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
December 25, 2021
in क्राईम
0

मुक्ताईनगर ( प्रतिनिधी ) – येथील पोलीस ठाण्यात काल रात्री दोन महिलांनी विनयभंगासह मारहाण आणि धमकल्याच्या तक्रारी दाखल केल्या आहेत . राजकीय वितुष्टातून दाखल करण्यात आलेल्या या फिर्यादींमधील आरोपी एक बाजूने माजी मंत्री एकनाथराव खडसे आणि दुसऱ्या बाजूने आमदार चंद्रकांत पाटील यांचे समर्थक आहेत .

शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसमधील बोदवड येथील निवडणुकीत उद्भवलेला वाद शांत होत नाही तोच मुक्ताईनगरात या दोन्ही पक्षाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये राडा झाला असून एकमेकांच्याविरूध्द गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

बोदवड नगरपंचायतीच्या मतदानाच्या दिवशी शिवसेना जिल्हाप्रमुख समाधान महाजन आणि मुक्ताईनगर तालुकाप्रमुख छोटू भोई यांनी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष रवींद्रभैय्या पाटील आणि जिल्हा बँकेच्या माजी अध्यक्षा रोहिणी खडसे यांच्याशी केलेल्या गैरवर्तनामुळे वातावरण तापले आहे. यामुळे रवींद्रभैय्यांसह पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन कारवाईची मागणी केली त्यांनी मुक्ताईनगरातील अवैध धंद्यांवर कारवाईची अपेक्षा देखील व्यक्त केली

दुसऱ्याच दिवशी समाधान महाजन आणि छोटू भोई यांनी सहकाऱ्यांसह जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन सत्य समोर आणण्याची मागणी केली. मुक्ताईनगरातील अवैध धंदे खडसे समर्थकांचेच असल्याचा आरोपदेखील त्यांनी केला. एकंदरीत शिवसेना आणि राष्ट्रवादीत यामुळे संघर्ष सुरू झाल्याचे दिसून येत आहे. या संघर्षाचा परिणाम मुक्ताईनगर मतदारसंघात उमटणार असल्याची शक्यता होती आणि झालेदेखील तसेच !

मुक्ताईनगर पोलीस स्थानकात काल रात्री दोन क्रॉस कंप्लेंट दाखल करण्यात आल्या आहेत. यातील पहिली फिर्याद एका महिलेने दिली असून यात शिवराज पाटील आणि अजय जैन (दोन्ही रा. मुक्ताईनगर) यांच्यासह सात-आठ जणांनी त्या महिलेचा विनयभंग करून मुलीस ढकलून देऊन पतीला जिवे ठार मारण्याची धमकी दिल्याचे नमूद करण्यात आले आहे. यानुसार मुक्ताईनगर पोलीस स्थानकात शिवराज पाटील, अजय जैन आणि इतर अज्ञात सात-आठ जणांच्या विरूध्द भादंवि कलम ३५४, ३२३, ४५२, ५०४, ५०६, १४१, १४३, ४२७ आदींसह कलम ३७ (१) आणि ( ३) चे उल्लंघन केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दुसऱ्या महिलेनेही मुक्ताईनगर पोलीस स्थानकात तक्रार नोंदविली आहे. यानुसार, ईश्वर हटकर (रा. खामखेडा, ता. मुक्ताईनगर) आणि सुनील पाटील (रा. मुक्ताईनगर) यांच्यासह सुमारे १४-१५ जणांच्या विरूध्द तक्रार देण्यात आली आहे. या आरोपींनी या महिलेचा विनयभंग केल्याचे नमूद करण्यात आलेले आहे. संबंधीत महिला आणि तिच्या पतीला मारहाण करून धमकावण्यात आल्याचेही या फिर्यादीत म्हटले आहे. यानुसार ईश्वर हटकर, सुनील पाटील आणि अन्य १४-१५ जणांच्या विरूध्द भादंवि कलम ३५४, १४१, १४३, ५०४, ५०६, ५०७ आणि ( ३) चे उल्लंघन केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दोन्ही गुन्ह्यांचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. कुणाल सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पो नि राहूल खताळ, उ नि प्रदीप शेवाळे, पो. ना. अविनाश पाटील हे करत आहेत.

या दोन्ही परस्परविरोधी तक्रारींमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. शिवराज पाटील आणि अजय जैन हे राष्ट्रवादीचे पदाधिकारी असून ते एकनाथराव खडसे यांचे कट्टर समर्थक आहेत. ईश्वर हटकर आणि सुनील पाटील हे शिवसेनेचे पदाधिकारी असून ते आमदार चंद्रकांत पाटील यांचा कट्टर समर्थक आहेत. यामुळे काल रात्रीच्या राड्यातून पुन्हा एकदा राष्ट्रवादी आणि शिवसेना आमने-सामने उभे ठाकल्याचे दिसून येत आहे. आगामी काळात हा संघर्ष अजून चिघळण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.


 

 

Previous Post

४१४ डेबिट कार्डचा डेटा चोरून कोट्यावधी रुपयाचा गंडा

Next Post

जळगावात ट्रकची दुचाकीला धडक ; दोन जण जखमी

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

जळगावात ट्रकची दुचाकीला धडक ; दोन जण जखमी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आव्हाणे येथील तरुणाचा गिरणा नदीपात्रात बुडून मृत्यू
1xbet russia

आव्हाणे येथील तरुणाचा गिरणा नदीपात्रात बुडून मृत्यू

March 5, 2026
चाळीसगाव तालुक्यात राजकीय वैमनस्यातून सरपंच, उपसरपंचांना ठार मारण्याचा प्रयत्न
1xbet russia

चाळीसगाव तालुक्यात राजकीय वैमनस्यातून सरपंच, उपसरपंचांना ठार मारण्याचा प्रयत्न

March 5, 2026
गोदावरी नर्सिंगच्या विद्यार्थींनीनी साजरी केली पर्यावरण पुरक धुळवड
1xbet russia

गोदावरी नर्सिंगच्या विद्यार्थींनीनी साजरी केली पर्यावरण पुरक धुळवड

March 5, 2026
 डॉ. वर्षा पाटील कॉलेज ऑफ कॉम्पुटर एप्लीकेशन महाविद्यालयाचा उपक्रम पर्यावरणपूरक होळी साजरी !
1xbet russia

गोदावरी व्यवस्थापन महाविद्यालयात पर्यावरणपूरक होळी साजरी !

March 5, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

आव्हाणे येथील तरुणाचा गिरणा नदीपात्रात बुडून मृत्यू

आव्हाणे येथील तरुणाचा गिरणा नदीपात्रात बुडून मृत्यू

March 5, 2026
चाळीसगाव तालुक्यात राजकीय वैमनस्यातून सरपंच, उपसरपंचांना ठार मारण्याचा प्रयत्न

चाळीसगाव तालुक्यात राजकीय वैमनस्यातून सरपंच, उपसरपंचांना ठार मारण्याचा प्रयत्न

March 5, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon