जळगाव ( प्रतिनिधी ) – केंद्र शासनाचा उपक्रम असलेल्या नेहरू युवा केंद्रातर्फे गुरुवारी कारगील विजय दिनानिमित्त रेल्वे स्थानक परिसर आणि रेल्वे पोलीस ठाणे परिसरात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.
देशभर यावर्षी आजादी का अमृत महोत्सव साजरा केला जात आहे. केंद्र सरकारचा उपक्रम असलेल्या नेहरू युवा केंद्रातर्फे विजय दिनानिमित्त रेल्वे स्थानक परिसरात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. नेहरु युवा केंद्राचे युवा अधिकारी नरेंद्र डागर यांच्या मार्गदर्शनाखाली उपक्रम राबविण्यात आला. स्वच्छता मोहिमेच्या उदघाटनप्रसंगी रेल्वे पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.