लखनौ ( वृत्तसंस्था ) – उत्तर प्रदेशमधील कानपूरमध्ये गर्लफ्रेंडसोबत हॉटेलमध्ये मजा करणाऱ्या पोलीस इन्स्पेक्टरला त्याच्या पत्नीने रंगेहात पकडले, त्यानंतर हॉटेलमध्ये पती, पत्नी आणि तिच्यामध्ये जोरदार हाणामारी झाली.
कानपूर पोलिसांनी महिला सशक्तीकरणासाठी आयोजित केलेल्या महिला शक्ति संगम कार्यक्रमात हे इन्स्पेक्टर सहभागी होणार होते. त्याचवेळी हॉटेलमध्ये त्यांना पकडण्यात आले.
हे प्रकरण कानपूरमधील ग्वालटोली पोलीस ठाणे क्षेत्रातील आहे. जिथे तैनात करण्यात आलेले इन्स्पेक्टर अरुण कुमार हे सोमवारी एका महिलेसोबत मजा करत होते. त्याचवेळी फार्रुखाबाद येथून त्यांच्या पत्नीने तिथे येऊन या दोघांनाही रंगेहात पकडले. त्यानंतर पती पत्नीमध्ये जोरदार हाणामारी झाली. अखेर पत्नीने तक्रार पोलीस अधिकाऱ्यांकडे केली.
इन्स्पेक्टर त्यावेळी हॉटेल केडी पॅलेसमध्ये थांबले होते. त्यानंतर सदर इन्स्पेक्टरांना सस्पेंड करण्यात आले आहे. हे इन्स्पेक्टर रंगेहात पकडले गेले. त्याचवेळी या परिसरामध्ये पोलिसांचा महिला शक्ती संगम कार्यक्रम सुरू होता.
हॉटेल मॅनेजरांनी सांगितले की, इन्स्पेक्टर अरुण कुमार हॉटेलमध्ये येत असत. तसेच हात-तोंड धुवून जात असत. दरम्यान, पोलीस ठाण्यातील अन्य पोलीस कर्मचाऱ्यांनी सांगितले की, अरुण कुमार यांच्यासोबत अन्य महिलेच्या प्रकरणातून हाणामारी झाली होती. त्यामध्ये त्यांचा हातही फ्रॅक्चर झाला होता. सध्या कानपूर पोलीस तपास करत आहेत.







