जळगाव (प्रतिनिधी) – जळगावातील रामेश्वर कॉलनी येथे राहणाऱ्या इसमाने रुग्णालयात उपचार घेत असलेल्या पत्नीचा मृत्यू झाल्याचे समजताच धक्का पचवून न शकणाऱ्या पतीने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना आज सकाळी घडली.
अरूण खंडू सोनवणे (वय-४७ रा. लाडली ता. धरणगाव ह.मु. नागसेन नगर, रामेश्वर कॉलनी जळगाव असे गळफास घेतलेल्या प्रौढाचे नाव आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
अरूण सोनवणे हे रामेश्वर कॉलनीमध्ये पत्नी मीराबाई आणि मुलगा अनिकेत यांच्यासह राहतात. ते कृषि उत्पन्न बाजार समितीत हमालीचे काम करून कुटुंबियांचा उदरनिर्वाह करतात. दरम्यान, गेल्या काही महिन्यांपासून त्यांची पत्नी मिराबाई सोनवणे ह्या दुर्धर आजार जडला होता. त्यांनी काही दिवसांपुर्वी मुंबई येथे पुढील उपचारासाठी हलविण्यात आले होते. त्यांच्यासोबत त्यांचा मुलगा अनिकेत होता. दरम्यान, ३१ नोव्हेंबर रोजी मीराबाई सोनवणे यांचा मुंबईत खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असतांना मृत्यू झाला.
दरम्यान, याबाबतचे वृत्त काळातच घरी असलेले अरूण सोनवणे यांनी आज सकाळी गळफास घेऊन आत्महत्या केली. आज सकाळी मीराबाई सोनवणे यांचा मृतदेह मुंबईहून येत असल्याने अरूण सोनवणे यांचे लहान भाऊ सुनिल सोनवणे हे घरात आवराआवर करण्यासाठी आज सोमवारी १ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजता अरूण सोनवणे यांच्या घरी गेले. त्यावेळी त्यांचा घरात दरवाजा आतून बंद होता. सुनिल यांनी घरात दरवाजा तोडला असता मोठा भाऊ अरूण सोनवणे यांनी राहत्या घरात गळफास घेतल्याचे आढळून आले.
दरम्यान, पत्नी मिराबाई सोनवणे यांच्या मृत्यूची वार्ता कळल्यानंतर त्यांनी धसका घेवून राहत्या घरात गळफास घेतल्याचे बोलले जात आहे. त्यांना खाली उतरवून भाऊ सुनिल सोनवणे व इतरांनी तत्काळ जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आणण्यात आला. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यची नोंद करण्यात आली आहे.