जळगाव ( प्रतिनिधी ) – दुकानासमोर उभ्या केलेल्या व्यापाऱ्याच्या दुचाकीच्या डिक्कीतून ३७ हजार ८०० रुपये चोरणाऱ्या २ आरोपींना आज जिल्हा पेठ पोलिसांनी अटक केली आहे
जिल्हापेठ पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गु र न-421/2021 ( कलम-379,34 भा द वि ) या गुंह्यातील फिर्यादी किशोर पंढरीलाल भंडारी ( 66 वर्ष, रा- विसनजीनगर ) यांची स्कुटर ( क्र एम एच 19 ए आर 4401 ) च्या डीक्कीमधुन क्रीम्सन फूड दुकानासमोरून रोख-37 हजार 800/- रुपये चोरांनी चोरून नेले होते ,
या गुन्ह्याच्या तपासात आरोपी निष्पन्न करून अजय बिरजू गांरुडे ( 30 वर्ष, कंजर वाडा) , व रितेश उर्फ चिंचा कृष्णा शिंदे ( वय 21 रा- रामेश्वर कॉलोनी) यांना सोमवारी दुपारी पोलिसांनी अटक केली दोन्ही आरोपींनी या चोरीची कबुली फिली असून अजय गांगुर्डे मुख्य न्याय दंडाधिकारी विनय मुगलीकर यांच्या न्यायालयात हजर केले असता त्याला 3 दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले या आरोपींन्नी चोरलेल्या रकमेपैकी 10000/-रुपये जप्त करण्यात आले आहेत आणखी मुद्देमाल जप्त करणे बाकी असलेने आणखी 2 दिवस पोलीस कोठडी मिळाली आहे
पो नि रामदास वाकोडे यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि महेंद्र वाघमारे, पो ना जुबेर तडवी, सलीम शेख,, पो कॉ विकास पाहुरकर, पो ना सलीम तडवी,पो कॉ योगेश साबळे, समाधान पाटील, रेहान खान , पो ना महेंद्र पाटील हे पुढील तपास करीत आहेत . या आरोपींकडून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे असे पोलिसांनी सांगितले .