जळगाव ( प्रतिनिधी ) – शहरातील मेहरूण परिसरातील हनुमाननगरात काळ मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते तपासणी झाल्यावर रुग्णांना या शिबिरात प्रकृतीची परिस्थिती लक्षात घेऊन औषधी वितरणही मोफत करण्यात आले.

मेहरूण येथील बालविकास प्रेरणा केंद्र ( सामाजिक आणि शैक्षणिक संस्था ) , आधार हाऊसिंग फायनान्स , वाय फोर डी फाउंडेशन आणि साताऱ्याची स्वयं सामाजिक संस्था हे या शिबिराचे संयोजक होते . काळ सकाळी ९ वाजेपासून दुपारी २ वाजेपर्यंत या शिबिरात रुग्णांची तपासणी करण्यात आली
मेहरूण येथील बालविकास प्रेरणा केंद्र या संस्थेचे अध्यक्ष समाधान पवार , डॉ मृण्मयी चौधरी , फार्मासिस्ट धीरजकुमार राठोड , आनंद पवार , निलेश चौधरी , मनोज शिंपी , ललित कोळी , गणेश शिंपी , चेतन परदेशी , दीपक घ्यार , अनिल पवार , जितेंद्र माळी , मनोज मांजराटे , सागर सोनवणे आदींनी या शिबिराच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.








