• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

रावण दहनास सशर्त परवानगी, मात्र मिरणूका नाही ; नवरात्रौत्सवासाठी मार्गदर्शक सुचना

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
October 5, 2021
in जळगाव
0

जळगाव ( प्रतिनिधी ) – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक नवरात्रौत्सव साधेपणाने साजरा करावा. गरबा, दांडिया व इतर सांस्कृतिक कार्यक्रमांऐवजी आरोग्यविषयक उपक्रमास प्राधान्य द्यावे असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले आहे आणि मार्गदर्शक सूचनाही जाहीर केल्या आहेत.

सार्वजनिक नवरात्रौत्सव साजरा करतांना नागरीकांनी योग्य खबरदारी घेणे आवश्यक आहे. ब्रेक द चेनअंतर्गत दिलेल्या मार्गदर्शक सुचनांचे पालन करावे. सार्वजनिक मंडळानी महानगरपालिका , नगरपालिका , स्थानिक स्वराज्य प्रशासन यांची पूर्वपरवानगी घेणे आवश्यक राहील. मर्यादित मंडप उभारण्यात यावेत, घरगुती तसेच सार्वजनिक देवीच्या मूर्तीची सजावट साध्या पध्दतीने करावी. मुर्तीची उंची सार्वजनिक मंडळाकरीता चार फुट व घरगुती मूर्तीची उंची दोन फुटाची मर्यादा असावी.
सांस्कृतिक कार्यक्रमांऐवजी आरोग्य विषयक उपक्रम जसे-रक्तदान शिबिरांचे आयेाजन करण्याचे करावे. त्याद्वारे कोरोना, मलेरिया, डेंग्यू इ. आजार आणि त्याचे प्रतिबंधात्मक उपाय तसेच स्वच्छतेबाबतही जागृती करावी.

देवीच्या दर्शनाची सुविधा ऑनलाईन करण्यात यावी, देवीच्या मंडपात प्रत्यक्ष येऊन दर्शन घेणाऱ्या भाविकांच्या बाबतीत ब्रेक द चेन अंतर्गत देण्यात आलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे. आरती, भजन, किर्तन आयोजित करताना गर्दी होणार नाही याची दक्षता घ्यावी. मंडपात एकावेळी 5 पेक्षा जास्त कार्यकर्त्यांची उपस्थिती नसावी. मंडपात खाद्यपदार्थ, पेयपानाची व्यवस्था करु नये. देवीच्या आगमन व विसर्जन मिरणवणूका काढू नये. महापालिका, विविध मंडळे, गृहनिर्माण संस्था, लोकप्रतिनिधी, स्वयंसेवी संस्था यांच्या मदतीने कृत्रिम तलावांची निर्मिती करावी. प्रशासनाने गर्दी टाळण्यासाठी मूर्ती स्वीकृती केंद्राची व्यवस्था करावी. घरगुती व सार्वजनकि नवरात्रौत्सवाचा परिसर प्रतिबंधित क्षेत्रात असेल तर मूर्ती विर्सजन सार्वजनिक ठिकाणी करण्यास मनाई राहील.

दसऱ्याच्या दिवशी रावण दहनाचा कार्यक्रम हा सर्व नियम पाळून करावा, रावण दहनाकरिता आवश्यक तेवढ्या किमान व्यक्तीच कार्यक्रमस्थळी हजर राहतील, प्रेक्षक बोलवू नये. त्यांना समाज माध्यमातून थेट प्रक्षेपण बघण्याची व्यवस्था करावी.

या कालावधीत स्थानिक प्रशासनाकडून अजून काही सूचना प्रसिद्ध झाल्यास त्यांचे पालन करावे. सूचनांचे पालन न केल्यास संबंधितांवर आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 व भारतीय दंड संहिता 1860 चे कलम 188 नुसार कारवाई करण्यात येईल. असेही अभिजीत राऊत, जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, जळगाव यांनी म्हटले आहे.


 

 

Previous Post

नशिराबाद नगरपरिषदेला पूर्णवेळ प्रशासक द्या ; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

Next Post

रेणुकेचा माहूर गड सज्ज, भाविकांसाठी 80 बसेस

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

रेणुकेचा माहूर गड सज्ज, भाविकांसाठी 80 बसेस

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बारी समाज माध्यमिक विद्यालयात गुरुपौर्णिमा उत्साहात
1xbet russia

बारी समाज माध्यमिक विद्यालयात गुरुपौर्णिमा उत्साहात

July 29, 2026
पाच लाख रुपयांच्या मागणीसाठी पाचोर्‍यात विवाहितेला गॅलरीतून खाली फेकले
1xbet russia

पाच लाख रुपयांच्या मागणीसाठी पाचोर्‍यात विवाहितेला गॅलरीतून खाली फेकले

July 29, 2026
डेंग्यू-मलेरियाविरोधात महापालिकेचा ‘अटॅक मोड’; घरभेटी, फॉगिंग आणि जनजागृती मोहिमेला वेग
1xbet russia

डेंग्यू-मलेरियाविरोधात महापालिकेचा ‘अटॅक मोड’; घरभेटी, फॉगिंग आणि जनजागृती मोहिमेला वेग

July 29, 2026
गुरुपौर्णिमेनिमित्त परमपूज्य दादाजी महाराज जोशी यांचा सन्मान
1xbet russia

गुरुपौर्णिमेनिमित्त परमपूज्य दादाजी महाराज जोशी यांचा सन्मान

July 29, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

बारी समाज माध्यमिक विद्यालयात गुरुपौर्णिमा उत्साहात

बारी समाज माध्यमिक विद्यालयात गुरुपौर्णिमा उत्साहात

July 29, 2026
पाच लाख रुपयांच्या मागणीसाठी पाचोर्‍यात विवाहितेला गॅलरीतून खाली फेकले

पाच लाख रुपयांच्या मागणीसाठी पाचोर्‍यात विवाहितेला गॅलरीतून खाली फेकले

July 29, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon