• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

जळगाव जिल्हा बँक निवडणूक: महायुतीची दमदार सुरवात; अर्ज माघारीच्या शेवटी शिवसेनेच्या दोन अन् भाजपची एक जागा बिनविरोध!

पारोळ्यात नलिनी पाटील, एरंडोलमध्ये मृणाल पाटील तर भुसावळमधून रजनीताई सावकारे संचालक

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
October 30, 2026
in खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
जळगाव जिल्हा बँक निवडणूक: महायुतीची दमदार सुरवात; अर्ज माघारीच्या शेवटी शिवसेनेच्या दोन अन् भाजपची एक जागा बिनविरोध!

जळगाव जिल्हा बँक निवडणूक: महायुतीची दमदार सुरवात; अर्ज माघारीच्या शेवटी शिवसेनेच्या दोन अन् भाजपची एक जागा बिनविरोध!

पारोळ्यात नलिनी पाटील, एरंडोलमध्ये मृणाल पाटील तर भुसावळमधून रजनीताई सावकारे  संचालक

जळगाव (विशेष प्रतिनिधी): जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत महायुतीने अत्यंत दणदणीत सुरवात केली आहे. निवडणूक अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवशी दुपारी तीन वाजेची मुदत संपल्यानंतर महायुतीच्या पारोळा, एरंडोल आणि भुसावळ येथील तीनही जागा बिनविरोध झाल्याचे स्पष्ट झाले आहे. यामध्ये शिवसेनेच्या दोन आणि भाजपच्या एका जागेचा समावेश असून, या दिग्गजांच्या कुटुंबातील महिला सदस्यांच्या रूपाने जिल्हा बँकेत नवीन चेहऱ्यांची वर्णी लागली आहे.

जिल्हा बँक निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस होता. निर्धारित वेळेत अर्ज छाननी आणि माघारीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर महायुतीच्या तीन महत्त्वाच्या सोसायटी मतदारसंघातून उमेदवारांची बिनविरोध निवड झाल्याचे समोर आले. यामध्ये पारोळा सोसायटी मतदारसंघातून नलिनी चिमणराव पाटील, तर एरंडोल सोसायटी मतदारसंघातून मृणाल अमोल पाटील यांनी बाजी मारली आहे. विशेष म्हणजे, नलिनी पाटील या माजी आमदार चिमणराव पाटील यांच्या पत्नी आहेत, तर मृणाल पाटील या आमदार अमोल पाटील यांच्या पत्नी आहेत. त्यामुळे या कुटुंबांमधील राजकीय वारसा आणि दबदबा आता जिल्हा बँकेच्या संचालक मंडळापर्यंत कायम राहिल्याचे दिसत आहे.

मंत्री संजय सावकारेंच्या पत्नीही बिनविरोध

याचप्रमाणे भुसावळ सोसायटी मतदारसंघातून राज्यमंत्री तथा भाजपचे नेते संजय सावकारे यांच्या सौभाग्यवती रजनीताई संजय सावकारे यांचीही बिनविरोध निवड झाली आहे. या विजयामुळे मंत्री संजय सावकारे यांच्या जागेवर आता त्यांच्या पत्नी जिल्हा बँकेच्या संचालिका म्हणून महत्त्वाची धुरा सांभाळणार आहेत.

या तिन्ही जागा बिनविरोध झाल्यामुळे महायुतीने जळगाव जिल्हा बँकेच्या निवडणुकीत आपले खाते अत्यंत मजबूत रितीने उघडले आहे. या बिनविरोध विजयांमुळे महायुतीच्या गोटात आनंदाचे वातावरण पसरले असून, आता उर्वरित जागांसाठी कोणकोण मदानात राहतो आणि अंतिम लढत कशी रंगते, याकडे संपूर्ण जळगाव जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. अर्ज माघारीची मुदत संपल्यानंतर निवडणुकीचे खरे   चित्र स्पष्ट होणार आहे.

Previous Post

अल्पवयीन मुलीवरील अत्याचारप्रकरणी एक जण जेरबंद

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगाव जिल्हा बँक निवडणूक: महायुतीची दमदार सुरवात; अर्ज माघारीच्या शेवटी शिवसेनेच्या दोन अन् भाजपची एक जागा बिनविरोध!
खान्देश

जळगाव जिल्हा बँक निवडणूक: महायुतीची दमदार सुरवात; अर्ज माघारीच्या शेवटी शिवसेनेच्या दोन अन् भाजपची एक जागा बिनविरोध!

October 30, 2026
बोदवडमध्ये देशी दारू दुकान फोडून ३९ हजारांचा ऐवज लंपास
क्राईम

अल्पवयीन मुलीवरील अत्याचारप्रकरणी एक जण जेरबंद

October 30, 2026
जैन इरिगेशनच्या सहामाहिचे २,६६९.८ कोटी रुपयांचे एकूण उत्पन्न
खान्देश

जैन इरिगेशनचा ‘सुपरक्रिटिकल’ कंपनीसोबत महत्त्वपूर्ण करार

October 30, 2026
जळगावचा घनकचरा प्रकल्प दोन वर्षांपासून रखडला; नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर
Uncategorized

जळगावचा घनकचरा प्रकल्प दोन वर्षांपासून रखडला; नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर

October 30, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जळगाव जिल्हा बँक निवडणूक: महायुतीची दमदार सुरवात; अर्ज माघारीच्या शेवटी शिवसेनेच्या दोन अन् भाजपची एक जागा बिनविरोध!

जळगाव जिल्हा बँक निवडणूक: महायुतीची दमदार सुरवात; अर्ज माघारीच्या शेवटी शिवसेनेच्या दोन अन् भाजपची एक जागा बिनविरोध!

October 30, 2026
बोदवडमध्ये देशी दारू दुकान फोडून ३९ हजारांचा ऐवज लंपास

अल्पवयीन मुलीवरील अत्याचारप्रकरणी एक जण जेरबंद

October 30, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!