मुंबई ( वृत्तसंस्था ) – राज्य सरकारकडून नवरात्रोत्सवाच्या मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत.
दुसरी लाट ओसरली असली तरी अजूनही कोरोनाचा धोका कायम आहे. त्यामुळे नागरिकांनी गर्दी करणे उचित होणार नाही. नवरात्रौत्सव साजरा करताना आरोग्याच्या दृष्टीकोनातून योग्य ती खबरदारी घेणे अत्यावःयक आहे.
कोवीड-१९ च्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता “ब्रेक द चेन” अंतर्गत दिलेल्या सुचनांचे तंतोतंत पालन करावे. नवरात्रौत्सवासाठी मंडळांनी महापालिका , स्थानिक प्रशासन यांची त्यांचे धोरणानुसार परवानगी घेणे आवश्यक राहील. मर्यादित स्वरुपाचे मंडप उभारण्यात यावेत. साध्या पध्दतीने घरगुती तसेच सार्वजनिक देवीच्या मुर्तीची सजावट करावी देवीच्या मुर्तीची उंची सार्वजनिक मंडळांकरीता ४ फूट व घरगुती देवीच्या मुर्तीची उंची २ फूट असावी.नवरात्रौत्सवाकरीता वर्गणी स्वेच्छेने दिल्यास त्यांचा स्वीकार करावा, जाहिरातीच्या प्रदर्शनामुळे गर्दी आकर्षित होऊ देऊ नये गरबा, दांडिया व इतर सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करु नयेत. त्याऐवजी आरोग्य विषयक उपक्रमी , शिबीरे (उदा. रक्तदान) आयोजित करण्यास प्राधान्य द्यावे असे या सूचनांमध्ये नमूद करण्यात आले आहे .