पाचोरा ( प्रतिनिधी ) – येथील अनिलदादा देशमुख चित्रकला महाविद्यालयालयातील द्वितीय वर्षाचा निकाल जाहीर झाला असून यात सुप्रीया कुलकर्णी, हर्षीता सोनार व स्वाती बच्छाव यांनी घवघवीत यश संपादन केले आहे.

कला संचालनालयाकडून घेण्यात आलेल्या शासकीय उच्चकला परीक्षा , कला शिक्षक प्रशिक्षण वर्ग (ए. टी. डी.) द्वितीय वर्ष या वर्गाचा निकाल नुकताच जाहीर झाला असून यात अनिलदादा देशमुख महाविद्यालय येथील प्रथम क्रमांक सुप्रीया कुलकर्णी, द्वितीय क्रमांक हर्षिता सोनार व तृतीय क्रमांक स्वाती बच्छाव प्राविण्यासह उत्तीर्ण झाल्या आहेत
गतवर्षीप्रमाणे यावर्षी पण १०० टक्के निकालाची परंपरा कायम असून विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादित केले. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेच्या अध्यक्षा कुसुम मित्रा, सचिव नरेश मित्रा, महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. संदीप पाटील, प्रा. निलेश शिंपी, कलाशिक्षक प्रमोद पाटील, सुबोध कांतायन, जितू काळे, राहुल पाटील, संदीप परदेशी, देसले फाउंडेशनचे अध्यक्ष देसले, राहुल सोनवणे तसेच पालकांनी अभिनंदन केले आहे.







