• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

दाऊद टोळीचा खजिनदार युसूफ लाकडावलाच तुरुंगात मृत्यू

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
September 9, 2021
in जळगाव
0

मुंबई ( प्रतिनिधी ) –  बिल्डर आणि दाऊद टोळीचा खजिनदार युसूफ लकडावालाचा ऑर्थर रोड कारागृहात मृत्यू झाला आहे.

पोलिसांनी लकडावलाला जे जे रुग्णालयात नेलं होते, मात्र त्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. युसूफ लकडावाला कॅन्सरने त्रस्त होता. मनी लाँडरिंगसह पैशाच्या अफरातफरीत ईडीने त्याला अटक केली होती. युसूफ लकडावाला मुंबईतील बिल्डर होताच, शिवाय तो बॉलिवूड आणि डी गँगचा मोठा फायनान्सरही होता.

2019 मध्ये जमीन खरेदीप्रकरणी सरकारी कागदपत्रामध्ये फेरफार करत पुरावे नष्ट करण्याच्या आरोपाखाली बिल्डर युसूफ लकडावालाला (76) अहमदबाद आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली होती. गुजरातमधील अहमदाबाद विमानतळावरून लंडनमध्ये पळून जाण्याच्या तयारी असलेल्या लकडावालाला अटक करण्यात झाली होती.

प्रसिद्ध अभिनेत्री साधना यांना 2010 मध्ये सांताक्रुज येथील जमिनीसाठी धमकावल्याप्रकरणी साधना यांनी बिल्डर युसूफ लकडावाला यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती. मात्र न्यायलयाने याप्रकरणी लकडावाला यांची निर्दोष सुटका केली होती.

युसूफ लकडावाला यांच्याविरोधात एप्रिल 2019 मध्ये आर्थिक गुन्हे विभागाने गुन्हा दाखल केला होता. हाच गुन्हा आता ईडीच्या अधिकाऱ्यांनी आपल्याकडे नोंदवून तपास सुरु केला. मग मे 2021 मध्ये युसूफ लकडावाला यांची अंमलबजावणी संचलनालयाकडून चौकशी करण्यात आली. हैदराबादच्या नवाबाची खंडाळा येथील 50 कोटी रुपयांची जमीन अल्प किमतीत लाटल्याचा आरोप होता. खंडाळ्याच्या या जमिनीशी संबंधित बिल्डरच्या काही संशयास्पद व्यवहारांची ईडी चौकशी करत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

पुणे जिल्ह्यातील खंडाळा येथे हैदराबादचे नवाब हिमायत नवाज जंग बहादूर यांच्या मालकीच्या जमिनीशी संबंधित कथित मनी लॉन्ड्रिंगचे हे प्रकरण आहे. ही जमीन 50 कोटी रुपयांची असल्याचे म्हटले जाते. मात्र लकडावाला यांनी जमीन ताब्यात घेण्यासाठी सरकारी अधिकारी, इस्टेट एजंट्स आणि इतर आरोपींना सुमारे 11.5 कोटी रुपयांची लाच दिल्याचा आरोप आहे. अधिकृत नोंदीनुसार सर्व्हे नंबर 104 (सीटीएस नंबर 11, 11A, 11B) वरील जागा 4 एकर आणि 38 गुंठ्यांची आहे.

मावळ तालुका उपनिबंधक जितेंद्र बडगुजर यांनी फिर्याद दिली होती. त्यानंतर लकडावाला आणि इतरांविरूद्ध फसवणूक, कट रचणे अशा आरोपांखाली भादंवि कलम 465, 466, 467, 468, 471, 420, 120-B आणि 201 नुसार, तर भारतीय नोंदणी अधिनियम कलम 82 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.

76 वर्षीय युसूफ लकडावाला यांनी गुरुवारी ईडी कार्यालयात जबाब नोंदवला. याआधी अनेक वेळा समन्स बजावूनही लकडावाला चौकशीसाठी गैरहजर राहिले होते. याआधी, अभिनेत्री साधना यांच्या राहत्या जागेला बळकावून धमकावल्याबद्दल युसूफ लकडावाला आणि त्यांच्या पत्नीला मुंबई पोलिसांनी अटक केली होती.


 

 

Previous Post

महाराष्ट्र सदन घोटाळ्यातून छगन भुजबळ निर्दोष मुक्त

Next Post

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील पोषण पुनर्वसन विभाग पुन्हा सुरु

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील पोषण पुनर्वसन विभाग पुन्हा सुरु

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयाचे सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय यश
1xbet russia

डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयाचे सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय यश

April 22, 2026
आयसीआरईएसटी २०२६ आंतरराष्ट्रीय परिषदेचा समारोप
1xbet russia

आयसीआरईएसटी २०२६ आंतरराष्ट्रीय परिषदेचा समारोप

April 22, 2026
महावितरणच्या ‘गो-ग्रीन’ योजनेत २ लाखांवर ग्राहकांचा सहभाग
1xbet russia

प्रॉम्पट, ऑनलाईन पेमेंट, गो-ग्रीनद्वारे वीजग्राहकांना 10 कोटींची सवलत

April 22, 2026
आयसीआरईएसटी २०२६ आंतरराष्ट्रीय परिषदेस प्रारंभ
1xbet russia

आयसीआरईएसटी २०२६ आंतरराष्ट्रीय परिषदेस प्रारंभ

April 22, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयाचे सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय यश

डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयाचे सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय यश

April 22, 2026
आयसीआरईएसटी २०२६ आंतरराष्ट्रीय परिषदेचा समारोप

आयसीआरईएसटी २०२६ आंतरराष्ट्रीय परिषदेचा समारोप

April 22, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon