मुंबई ( प्रतिनिधी ) – महाराष्ट्र सदनातील कथित घोटाळ्या प्रकरणी अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजपळ यांची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. यात भुजबळांना कारागृहात जावे लागले होते.
महाराष्ट्र सदनाच्या कामात भ्रष्टाचार झाल्याच्या विरोधात एसीबीने भुजबळांसह इतरांना आरोपी केले . छगन भुजबळ व त्यांचा पुतण्या समीर भुजबळ यांनी अर्ज करून आपल्यावर करण्यात आलले आरोप हे निराधार आहेत. त्यामुळे न्यायालयाने आपल्याला दोषमुक्त करावे अशी मागणी केली होती. त्यावर सुनावणी होऊन आज न्यायालयाने भुजबळांची निर्दोष मुक्तता केली आहे. याआधीच एसीबीने याच महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणातील पाच आरोपींना निर्दोष मुक्त केले आहे.

आरोपींविरोधात कुठलेही सबळ पुरावे एसीबीकडे उपलब्ध नाहीत असे न्यायालयाने म्हटले आहे. याआधी महाराष्ट्र सदन कथित घोटाळा प्रकरणी छगन भुजबळ आणि त्यांच्या कुटुंबियांविरोधात पुरावे असल्याचा दावा करत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने भुजबळ यांच्या प्रकरणातून दोषमुक्त करण्याच्या मागणीला विरोध केला होता. भुजबळ आणि त्यांच्या कुटुंबियांना महाराष्ट्र सदनाच्या बांधकामाचे कंत्राट देण्यासाठी पैसे मिळाले होते याचा पुरावा असल्याचा दावा एसीबीतर्फे करण्यात आला होता.







