• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

नवीन केंद्रीय सहकार खात्याचा महाराष्ट्राला फायदाच – प्रविण दरेकर

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
July 8, 2021
in महाराष्ट्र
0

मुंबई (वृत्तसंस्था) – महाराष्ट्राला सहकाराची पंरपरा लाभली आहे. राज्यामध्ये ग्रामीण भागाच्या विकासात सहकाराचे मोठे योगदान आहे. त्यामुळे महाराष्ट्राचा सहकार आता केंद्रीय पातळीवर पोहचला असून याचा लाभ नक्कीच महाराष्ट्राला व अन्य राज्यांना होईल व महाराष्ट्राचे सहकार अधिक बळकट होईल, असा विश्वास विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी व्यक्त केला. प्रविण दरेकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे महाराष्ट्र आणि महाराष्ट्रातील सहकार चळवळीच्या वतीने मनःपूर्वक आभार मानले.

केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे आणखी एक नवी आणि मोठी जबाबदारी सोपवली आहे. त्यासंदर्भात बोलताना दरेकर म्हणाले, सहकाराचा अनुभव असलेले धाडसी नेतृत्व सहकार खाते सांभाळणार आहे. गृहमंत्री अमित शाह अहमदाबाद जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष होते. त्यांची कार्यपद्धती उत्तम असून त्यांचा या विषयात अभ्यास चांगला आहे. अमित शाह मुंबई दौऱ्यावर आले होते, त्यावेळी माझ्यासोबत त्यांनी सुमारे दोन तास सहकार चळवळीवर चर्चा केली. गावातील विविध कार्यकारणी सोसायटीपासून ते राष्ट्रीय स्तरावरच्या सहकार सेक्टरचं त्यांना खूप ज्ञान असून सहकार विषयात ते अनुभवी आहेत. त्यामुळे महाराष्ट्राला त्यांच्या अनुभवाचा खूप उपयोग होईल, असा विश्वास दरेकर यांनी व्यक्त केला.

सहकार हे केंद्राच्या कृषी कायद्यांतर्गत एक छोटासा भाग आहे. देशभर वेगवेगळ्या प्रकारची राष्ट्रीय सहकारी फेडरेशन महामंडळ आस्थापना आहेत, परंतु त्यांना स्वतंत्र असं खात नव्हतं. पण आता निश्चितपणे सहकार खात्याच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या व विविध राज्यांमधील सहकाराला बळकटी मिळेल. महाराष्ट्रातील साखर कारखाने केवळ सहकराच्या जीवावर स्थिरावले असून सहकारी साखर कारखान्यांना केंद्राच्या माध्यमातून जी बळकटी आवश्यक आहे, ती बळकटी निश्चितपणे केंद्रीय सहकार खात्यांच्या माध्यमातून मिळेल असा विश्वास दरेकर यांनी यावेळी व्यक्त केला.

सहकार खात्याची जबाबदारी अमित शाह यांच्याकडे सोपविणे म्हणजे निश्चितच सहकार चळवळ सशक्त करणे आणि सहकाराच्या माध्यमातून राज्यांच्या सर्वांगीण विकासात योगदान देणं हाच खरा उद्देश आहे. त्यामुळे कोणावर अंकुश आणण्यासाठी या नवीन खात्यांची निर्मिती झालेली नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.


 

 

Previous Post

SBI जनरल इन्शुरन्सची नवी योजना लाँच

Next Post

UIDAIने आधार कार्डसंदर्भात केला अलर्ट जारी

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

UIDAIने आधार कार्डसंदर्भात केला अलर्ट जारी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगावसह राज्यातील महानुभाव पंथाच्या तीर्थक्षेत्रांची नोंदणी अधिवेशनापूर्वी पूर्ण करा
Uncategorized

जळगावच्या हिंगोणेत केळी टिश्यू कल्चर प्रकल्पाला २० हेक्टर जमीन देण्यास शासनाची मंजुरी

March 31, 2026
जळगाव मेहरूण परिसरात प्रॉपर्टीच्या वादातून दोन गटात वाद, तुंबळ दगडफेक
1xbet russia

जळगाव मेहरूण परिसरात प्रॉपर्टीच्या वादातून दोन गटात वाद, तुंबळ दगडफेक

April 1, 2026
 माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव ; अभियानाला १ एप्रिलपासून प्रारंभ
1xbet russia

 माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव ; अभियानाला १ एप्रिलपासून प्रारंभ

March 31, 2026
… तर मी राजीनामा देऊन राजकारणातून निवृत्त होईल
1xbet russia

हत्तीरोग निर्मूलनासाठी ‘ट्रिपल ड्रग थेरपी’ (आयडीए) मोहिमेला वेग – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

March 31, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जळगावसह राज्यातील महानुभाव पंथाच्या तीर्थक्षेत्रांची नोंदणी अधिवेशनापूर्वी पूर्ण करा

जळगावच्या हिंगोणेत केळी टिश्यू कल्चर प्रकल्पाला २० हेक्टर जमीन देण्यास शासनाची मंजुरी

March 31, 2026
जळगाव मेहरूण परिसरात प्रॉपर्टीच्या वादातून दोन गटात वाद, तुंबळ दगडफेक

जळगाव मेहरूण परिसरात प्रॉपर्टीच्या वादातून दोन गटात वाद, तुंबळ दगडफेक

April 1, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon