नवी दिल्ली (वृत्तसंस्था) – भारतातील आघाडीच्या विमा कंपन्यांपैकी एक असणाऱ्या एसबीआय जनरल इन्शुरन्सने आज एक व्यापक आरोग्य विमा योजना सुरू केलीय. यामध्ये ग्राहकांकडे संपूर्ण आरोग्य विमा संरक्षण असेल. ज्यामध्ये त्यांना 5 कोटींपर्यंत कव्हरेज मिळेल. याव्यतिरिक्त 20 मूलभूत कव्हर्स आणि 8 पर्यायी कव्हर्स देखील उपलब्ध असतील. एवढेच नव्हे तर या नवीन योजनेत ग्राहक त्यांच्या मर्जीनुसार पॉलिसीची मुदत आणि इतर गोष्टी निवडू शकतात.
‘आरोग्य सुप्रीम’मध्ये आरोग्य विमा योजना विविध प्रकारच्या पर्यायांची ऑफर देते, ज्यामध्ये ग्राहक विमा रक्कम आणि कव्हरेज सुविधांच्या आधारावर प्रो, प्लस आणि प्रीमियम या तीन पर्यायांमधून निवड करू शकतात. या व्यतिरिक्त ग्राहकांना विम्याची रक्कम परतफेड करण्याचा पर्याय, पुनर्प्राप्ती लाभ, अनुकंपा प्रवास इ. इतर पर्यायांमध्ये मिळतात. यासह ग्राहकांना 1 ते 3 वर्षांपर्यंत पॉलिसीची मुदत निवडण्याची सुविधा देखील आहे.
याबाबत एसबीआय जनरल विमा कंपनीचे एमडी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी पीसी कंदपाल म्हणाले, “आजच्या परिस्थितीत आरोग्य विमा हा केवळ एक पर्याय नव्हे तर एक गरज बनला आहे. आरोग्य सुप्रीम, एक व्यापक आरोग्य विमा योजना आहे, विमा रकमेच्या विस्तृत सुविधा ग्राहकांना त्यांच्या आवश्यकतेनुसार प्रीमियम आणि कार्यकाळ निवडण्यास सक्षम करेल. ” कोविड19 साथीच्या आजाराच्या उपचारात लोकांना अडचणींचा सामना करावा लागू नये हे लक्षात ठेवून संपूर्ण आरोग्य विमा खास तयार केला गेलाय. यामुळे लोकांचे बजेट खराब होणार नाही. आरोग्य सुप्रीम ही एक विमा पॉलिसी आहे, ज्याचा फायदा किरकोळ ग्राहकांनाही मिळेल.
कोरोना महामारीमुळे आरोग्य विमा लोकांची संख्या झपाट्याने वाढलीय. हेच कारण आहे की आरोग्य विमा किंमत निर्देशांकात वाढ झाली. 2021च्या पहिल्या तिमाहीच्या (क्यू १) च्या तुलनेत आरोग्य विमा किंमत निर्देशांकात 4.87% च्या वाढीसह क्यू 2 मध्ये मोठा बदल झाला. यामुळे विमा प्रीमियम किमतींच्या निर्देशांक मूल्यात 25,197 डॉलरची वाढ झाली. अहवालानुसार, आरोग्य विमा निर्देशांक मागील दोन तिमाहीत म्हणजेच Q4FY20 आणि Q1FY21 मध्ये 24,026 वर स्थिर राहिले.