• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

गोलाणी’तील तळमजल्यात साचणार्‍या पाण्यासह दुर्गंधीची महापौरांकडून दखल

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
June 19, 2021
in जळगाव, महाराष्ट्र
0

सांडपाण्याचा निचरा, स्वच्छतेचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावण्याचे आदेश

जळगाव;- शहरातील मध्यवर्ती व्यापारी संकुल म्हणून गणल्या जाणार्‍या व महापालिकेच्या सतरा मजली इमारतीपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या गोलाणी मार्केटमधील तळमजल्यात नेहमीच साचणारे तळे, सांडपाण्यामुळे निर्माण होणारी दुर्गंधी आणि ठिकठिकाणी साचणारे कचरा, फुले, भाजीपाल्याच्या घाणीचे ढीग ही बाब तेथील गाळेधारकांसह व्यावसायिक, नागरिकांसाठी नेहमीचीच डोकेदुखी बनलेली आहे. यासंदर्भात संबंधितांकडून वारंवार तक्रारीही केल्या जातात. मात्र, हा प्रश्न कायमच आहे. वृत्तपत्रातून बातम्या आल्यानंतर त्याची महापौर सौ.जयश्री महाजन यांनी गंभीरपणे दखल घेऊन महापालिका आरोग्य विभागाच्या अधिकार्‍यांसह कर्मचार्‍यांचा ताफा गोलाणी मार्केटमधील तळमजल्यात नेऊन सर्व प्रकार प्रत्यक्ष पाहिला. त्यानंतर संबंधित अधिकार्‍यांकडून यासंदर्भात सविस्तर माहिती जाणून घेत तत्काळ सांडपाण्याचा निचरा करून साचलेले कचर्‍याचे ढीग उचलून चोकअप झालेले चेंबर उघडून तेथील पाणी प्रवाही करण्याच्या सूचना केल्या. त्यानंतर तेथे आणलेल्या व्हॅक्यूम क्लिनर व्हॅनसह यंत्रणेच्या सहाय्याने संपूर्ण चोकअप चेंबर उघडून त्यात जीव धोक्यात घालत कर्मचारी उतरून पाण्याचा निचरा करण्यासह तेथील परिसर स्वच्छ करण्यात आला. दरम्यान, या गंभीर समस्येसंदर्भात महापौर सौ.जयश्री सुनिल महाजन यांनी पुन्हा सायंकाळी आपल्या दालनात आयुक्त श्री.सतीश कुलकर्णी यांच्या उपस्थितीत आरोग्य विभागाचे सर्व अधिकारी, कर्मचार्‍यांची बैठक बोलावून गोलाणी मार्केटमधील विविध प्रश्नांसंदर्भात कुठलीही कारणे न सांगता तेथील समस्या कायमस्वरूपी निकाली काढण्यासंदर्भात तत्काळ ठोस उपाययोजना कराव्यात, असे आदेश दिले.

महापालिका आरोग्य विभागाचे सहाय्यक आयुक्त श्री.पवन पाटील, प्रभाग समिती क्र. 1 चे अधिकारी श्री.व्ही.ओ. सोनवणे, आरोग्य निरीक्षक श्री.कांबळे यांच्यासह आरोग्य विभागाचे कर्मचारी यावेळी उपस्थित होते. महापौर सौ.जयश्री सुनिल महाजन यांनी विविध वृत्तपत्रांत प्रसिद्ध झालेले वृत्त सकाळीच वाचले अन् महापालिका आरोग्य विभागाच्या अधिकारी, कर्मचार्‍यांना सोबत घेऊन गोलाणी मार्केटमधील तळमजला गाठला. तेथील साचलेणे सांडपाणी, कुजक्या भाजीपाला, फुलांच्या साचलेल्या घाणीचे ढीग आणि चोकअप झालेले चेंबर या स्थितीमुळे निर्माण झालेली दुर्गंधी पाहून संतप्त स्वरात साचलेले सांडपाणी काढून घाणीचे ढीग तत्काळ उचला. चोकअप झालेले चेंबर उघडून संपूर्ण पाण्याचा निचरा करा, काहीही घाण ठेवू नका, अशा संबंधितांना सूचना केल्या. त्यानंतर कर्मचारी जीव धोक्यात घालत चेंबर उघडून खाली उतरले व त्यांनी 2 रिड्युस पाईप टाकून सांडपाणी प्रवाही केले.

दरम्यान, सायंकाळी पुन्हा आरोग्य विभागाच्या सर्व कर्मचार्‍यांना महापौर सौ.जयश्री सुनिल महाजन यांनी आयुक्त श्री.सतीश कुलकर्णी यांच्यासह आपल्या दालनात बैठकीसाठी बोलावून गोलाणी मार्केटमधील विविध समस्या या वर्षानुवर्षे कायमच आहेत. त्यामुळे त्यावर नुसतेच तात्पुरते उपाय न योजता सर्व समस्या कायमस्वरूपी निकाली काढा. यापुढे कुठलीही कारणे ऐकून घेतली जाणार नाहीत. तत्काळ उपाय शोधून कायमस्वरूपी ते अमलात आणण्याचे आदेश दिले. यापुढे गोलाणीच नव्हे, तर कोणत्याही व्यापारी संकुलातील अस्वच्छतेचा प्रश्न खपवून घेतला जाणार नाही, अशी तंबीही यावेळी महापौर सौ.जयश्री सुनिल महाजन यांनी संबंधितांना दिली.


 

 

Previous Post

माजी आमदार दिलीप वाघ यांनी घेतली कोरोना लस

Next Post

सर्वरोग निदान शिबीर गरजुंसाठी संजीवनी -गुलाबराव वाघ

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

सर्वरोग निदान शिबीर गरजुंसाठी संजीवनी -गुलाबराव वाघ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बॅन्ड साहित्य चोरल्याचा गुन्ह्यात ७ जणांना अटक, एकाच शोध सुरु
1xbet russia

लग्नाला नकार दिला म्हणून तरुणीवर प्राणघातक हल्ला; संशयिताला अटक

February 22, 2026
डॉ. अमित राणे यांची जपानमधील प्रतिष्ठित ‘WFVS’ फेलोशिपसाठी निवड
1xbet russia

डॉ. अमित राणे यांची जपानमधील प्रतिष्ठित ‘WFVS’ फेलोशिपसाठी निवड

February 22, 2026
दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याने तरुणावर केले चाकूने वार
1xbet russia

चाळीसगाव न्यायालय परिसरात वकिलावर जीवघेणा हल्ला

February 22, 2026
पाचोरा तालुक्यातील सरपंचपदासाठी आरक्षण जाहीर
1xbet russia

राज्यातील मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींवर आता विद्यमान सरपंचच ‘प्रशासक’

February 22, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

बॅन्ड साहित्य चोरल्याचा गुन्ह्यात ७ जणांना अटक, एकाच शोध सुरु

लग्नाला नकार दिला म्हणून तरुणीवर प्राणघातक हल्ला; संशयिताला अटक

February 22, 2026
डॉ. अमित राणे यांची जपानमधील प्रतिष्ठित ‘WFVS’ फेलोशिपसाठी निवड

डॉ. अमित राणे यांची जपानमधील प्रतिष्ठित ‘WFVS’ फेलोशिपसाठी निवड

February 22, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon