• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

पालकमंत्र्याच्याहस्ते १३ रुग्णवाहिकांचे हिरवी झेंडी दाखवून लोकार्पण

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
June 12, 2021
in जळगाव, महाराष्ट्र
0

जळगाव ;- कोविड आपत्तीमुळे जिल्ह्यासाठी पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी राज्य शासनाकडे नवीन अद्ययावत रूग्णवाहिकांची मागणी केली होती. या पूर्ततेचा पहिला टप्पा पार पडला असून आज ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते १३ रूग्णवाहिकांचे हिरवी झेंडी दाखवून लोकार्पण करण्यात आले.

जिल्ह्यातील अनेक ग्रामीण रुग्णालय व प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये असणार्‍या रूग्णवाहिका जुन्या झाल्यामुळे अडचणी येत होत्या. कोरोनाची आपत्ती सुरू झाल्यानंतर वाढीव प्रमाणात रूग्णवाहिकांची आवश्यकता निर्माण झाली. याची दखल घेऊन तत्परतेने पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी राज्य शासनाकडे जळगाव जिल्ह्यासाठी ३५ रूग्णवाहिकांची मागणी केली होती. याला शासनाने मंजुरी दिली असून यातील पहिल्या टप्प्यात १३ रूग्णवाहिका जिल्ह्यासाठी प्राप्त झाल्या आहेत. तर उर्वरित रूग्णवाहिका लवकरच प्राप्त होणार आहेत.

या रूग्णवाहिकांचे आज जिल्हा रूग्णालयात लोकार्पण करण्यात आले. पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी हिरवी झेंडी दाखवून या रूग्णवाहिका शासकीय सेवेसाठी अर्पीत केल्या. या १३ रूग्णवाहिका जिल्ह्यातील विविध ग्रामीण रूग्णालयांना प्रदान करण्यात आल्या

एक मोठ्या वाहनातील अद्ययावत सामग्रीने सज्ज असणारी मोबाईल मेडिकल युनिट ही रूग्णवाहिका आहे. ही रूग्णवाहिका जिल्ह्यातील चोपडा, यावल, रावेर आदी तालुक्यांमधील आदिवासी बहुल भागांमध्ये नियमितपणे फिरवण्यात येणार आहे. यामुळे दुर्गम भागातील रूग्णांना देखील थेट त्यांच्या पाड्यावर अद्ययावत उपचार मिळणार आहेत.

पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी आज जिल्हा रूग्णालयात या रूग्णवाहिकांचे लोकार्पण केले. यात चालकांना चाव्या देऊन अ‍ॅब्युलन्सेसला हिरवी झेंडी दाखविण्यात आली. याप्रसंगी रूग्णवाहिका चालकांचा प्रातिनिधीक स्वरूपात सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी ना. गुलाबराव पाटील म्हणाले की, कोविड आणि नॉन कोविड या दोन्ही प्रकारातील रूग्णांना वेळेत उपचार मिळणे अत्यावश्यक असते. यात बर्‍याच रूग्णांना अँब्युलन्सची आवश्यकता पडत असते. या पेशंटसाठी रूग्णवाहिका मिळावी यासाठी आपण पाठपुरावा केला असून आता उर्वरित अ‍ॅब्युलन्सेसही लवकरच मिळणार आहेत. जिल्ह्यात रूग्णांना तातडीने उपचार मिळण्यासाठी आपण कटीबध्द असल्याचेही ना. गुलाबराव पाटील यांनी आवर्जून नमूद केले.

जिल्ह्यातील पाल , रावेर , अमळनेर या ग्रामीण रुग्णालयाना तसेच मुक्ताईनगर व जामनेर येथील उपजिल्हा रुग्णालयाला अशा 5 ठिकाणी तर प्राथमिक आरोग्य केंद्र मांडळ (अमळनेर ) , कजगाव (भडगाव ) , रांजणगाव व उंबरखेड (चाळीसगाव) , अडावद व वैजापूर (चोपडा ), वाकोद (जामनेर) , लोहारा (पाचोरा) या 8 प्रा. आ. केंद्रात रुग्णवाहिका मिळाल्याने त्या – त्या परिसरातील रुग्णांना दिलासा मिळणार आहे.

याप्रसंगी जिल्हा परिषद अध्यक्षा ना. रंजना ताई पाटील , मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.बी.एन.पाटील , शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता जयप्रकाश रामानंद, जिल्हा शल्य चिकित्सक नागोजीराव चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी भीमाशंकर जमादार , जि .प . चे आरोग्य सभापती रवींद्र पाटील, जि.प.सदस्य अमित पाटील, दीपक राजपूत , उद्धव मराठे, टेम्पो फोर्स कंपनीचे संचालक चंद्रशेखर अग्रवाल , आतिष सोनवणे, सेवा अभियंता विवेक नारखेडे यांच्यासह डॉक्टर व वाहनचालक उपस्थित होते.


 

 

Previous Post

जळगाव जामोद येथून फरार चोरट्याला रिक्षासह घेतले ताब्यात

Next Post

जिल्ह्यात ७७ कोरोना बाधित रुग्ण आढळले ; १८७ बरे

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

जिल्ह्यात ७७ कोरोना बाधित रुग्ण आढळले ; १८७ बरे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पारोळ्यात लग्नानंतर जेवणातून विष देऊन तिघांना मारण्याचा प्रयत्न; दोन महिला आरोपी अटकेत
क्राईम

पारोळ्यात लग्नानंतर जेवणातून विष देऊन तिघांना मारण्याचा प्रयत्न; दोन महिला आरोपी अटकेत

October 11, 2026
एरंडोलमध्ये अवैध सावकारीप्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
क्राईम

एरंडोलमध्ये अवैध सावकारीप्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

October 9, 2026
रावेरच्या भगवती नगरात घरफोडी; सोन्याचे दागिने व रोकड लंपास
क्राईम

रावेरच्या भगवती नगरात घरफोडी; सोन्याचे दागिने व रोकड लंपास

October 9, 2026
भोकरखेडजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार गंभीर जखमी
क्राईम

भोकरखेडजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार गंभीर जखमी

October 9, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

पारोळ्यात लग्नानंतर जेवणातून विष देऊन तिघांना मारण्याचा प्रयत्न; दोन महिला आरोपी अटकेत

पारोळ्यात लग्नानंतर जेवणातून विष देऊन तिघांना मारण्याचा प्रयत्न; दोन महिला आरोपी अटकेत

October 11, 2026
एरंडोलमध्ये अवैध सावकारीप्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

एरंडोलमध्ये अवैध सावकारीप्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

October 9, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon