जळगाव ( प्रतिनिधी ) ;- शहरातील एमआयडीसी पोलीस स्टेशन हद्दीतील दोन रेकॉर्डवरील गुन्हेगारांवर जिल्हाबाहेर दोन वर्षांसाठी हद्दपार केल्याची कारवाई करण्यात राहुल रामचंद्र ब-हाटे (27) रा. रामेश्वर कॉलनी व गोलु उर्फ दत्तु नारायण चौधरी (26) रा. तुकाराम वाडी जळगाव असे या गुन्हेगारांची नवे आहेत.
दोघांवर महाराष्ट्र पोलिस अधिनियम कलम 55 नुसार त्यांच्याविरुद्ध हद्दपारीचा प्रस्ताव पाठवण्यात आला होता.
वरिष्ठ पोलिस अधिका-यांकडून दोघांच्या हद्दपारीच्या प्रस्तावाचा पाठपुरावा करण्यात आला. सदर प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर दोघांना दोन वर्षासाठी जळगाव जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे. या कारवाईसाठी पोलिस उपनिरीक्षक रामकृष्ण पाटील, सहायक फौजदार अतुल वंजारी, पो.कॉ. सचिन पाटील, योगेश बारी यांनी कारवाई केली . पोलिस अंमलदार इमरान सैय्यद व गोविंदा पाटील यांनी दोघांना धुळे शहरात स्थानबद्ध केले आहे.