जळगाव ( प्रतिनिधी ) ;- ५ जून जागतिक पर्यावरण दिनानिमित्त मेहरूण येथील श्रीराम माध्यमिक विद्यालय मेहरुण येथे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील ,नगरसेवक प्रशांत नाईक, संस्था सचिव अशोक लाडवंजारी यांचेहस्ते शाळेच्या प्रांगणात पिंपळ, कडुनिंब , गुलमोहर असे २५ रोपटे लावण्यात आली. या वेळीविलास भदाणे , सलीम इनामदार , अनिल सोनवणे , शबाना बी सादिक खाटीक. (नगरसेविका) , मुख्याध्यापक दिवाकर जोशी , सलमान खाटीक , नईम खाटीक, दिनेश पाटील ,अमित तडवी , संतोष चाटे. शाळेतील शिक्षीका सौ. संध्या कुलकर्णी , सौ.शननो पिंजारी , प्रतिभा पाटील .सौ जयश्री तायडे, संजय बडगुजर , आदी उपस्थित होते
या वेळी रवींद्र पाटील , व प्रशांत नाईक यांचा विद्यालयातर्फे शाल व श्री फळ देवुन सत्कार करण्यात आला.