एमआयडीसी कंपनीतील घटना
जळगाव ( प्रतिनिधी ) ;- एमआयडीसी परिसरातील एम सेक्टर मधील एका राहत्या घरात ६० वर्षीय वृद्ध महिलेने आजाराला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना आज दुपारी २: ४० पूर्वी घडली असून परिसरात खळबळ उडाली आहे.
याबाबत सूत्रांची दिलेली माहिती अशी कि, सिंधूबाई वामन बुनकर वय ६० रा. एमआयडीसी कॉलनी ,भारत गॅस जवळ, सुधाकर नगर एम सेक्टर जळगाव . या सतत आजारी असल्याने आजाराला कंटाळून आज ५ रोजी दुपारी २ : ४० पूर्वी वाजेपूर्वी त्यांनी घरातील पंख्याला दोरीने बांधून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. त्यांना जिल्हा वैद्यकीय महाविद्यालयात आणले असता सीएमओ डॉ. सचिन अहिरे यांनी मृत घोषित केले. याबाबत एमआयडीसी पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून जिल्हा वैद्यकीय महाविद्यालयात मृतदेह शवविच्छेदनासाठी आणण्यात आला. प्राथमिक तपास महेंद्र गायकवाड, शांताराम पाटील आदी करीत आहे. दरम्यान मयत वृद्धेच्या पश्चात पती,मुलगा ,३ मुली , नातवंडे असा परिवार आहे.