जळगाव (प्रतिनिधी ) ;- पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील यांच्या वाढदिवसा निम्मित आज ५ जुन रोजी युवासेनेचे जिल्हाप्रमुख शिवराज रावसाहेब पाटील यांचे संकल्पनेतुन चिंचोली,धानवड,उमाळे व कंडारी येथील गरिब व गरजु शेतकरी यांना कापूस,ज्वारी व तुर मोफत बियाणे वाटपाचा कार्यक्रम शिवसेना जिल्हाप्रमुख विष्णु भंगाळे , जि.प सदस्य प्रतापराव पाटील, शिवसेना नगरसेवक शाम कोगटा यांचे हस्ते चिंचोली येथे घेण्यात आला. यावेळी शिवसेनेचे ता.संघटक संजय घुगे, चिंचोलीचे सरपंच शरद घुगे, पिंटू धुमाळ , केतन पोळ धानवडचे सरपंच संभाजी पवार ,उपसरपंच दिलीप चव्हाण, हरीलाल शिंदे, जनार्दन पाटील,उमाळे सरपंच राजु पाटील, देविदास कोळी , कंडारी उपसरपंच मल्हारराव देशमुख ,व लाभार्थि शेतकरी उपस्थित होते.
यशस्वितेसाठी युवासेनेचे विधानसभा क्षेत्रप्रमुख विजय लाड, तालुका सरचिटणीस अविनाश पाटील, उपतालुका प्रमुख अतुल घुगे,व जगदीश कोळी यांनी परीश्रम घेतले.