हैदराबाद (वृत्तसंस्था) – कोरोनामुळे देशात लाखो लोकांचा जीव गेला आहे. कोरोनाची लागण झालेल्या कित्येक रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान आता देशात कोरोनाने एका सिंहाचाही बळी घेतला आहे. देशातील पहिल्या सिंहाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
9 वर्षाची सिंहिण नीलाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तामिळनाडूच्या अरिगनर अण्णा प्राणीसंग्रहायातील ही घटना आहे. तर आणखी आठ सिंह कोरोना पॉझिटिव्ह आहेत.
इंडियन एक्स्प्रेसच्या रिपोर्टनुसार प्राणीसंग्रहालयाने दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी संध्याकाळी 6.15 वाजता या सिंहिणीचा मृत्यू झाला आहे. तिच्यामध्ये काही लक्षणं नव्हती. मृत्यूच्या एक दिवस आधी तिच्या नाकातून स्राव आला होता. तसं लक्षण दिसताच आम्ही तिच्यावर तात्काळ उपचार केले होते.इथल्या अकरा सिंहाचे नमुने तपासणीसाठी पाठवले होते. ते कोरोना प़ॉझिटिव्ह आले होते. सध्या आठ सिंहांवर उपचार सुरू आहेत.