मुंबई (वृत्तसंस्था ) ;- देशामध्ये गेल्या काही दिवसांपासून सुरू असेल्या प्रत्येक विषयावर स्वत:चं मतं मांडण्यात आघाडीवर असणाऱ्या कंगणा राणावतला अखेर कोरोनाची लागण झालेली आहे.कंगणाने गेल्या वर्षभरात अनेक मुद्दयांवक महाराष्ट्र सरकार,उद्धव ठाकरे,संजय राऊत यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले आहेत.कंगणा भाजपशी निगडीत असल्याचा आरोप तिच्यावर सातत्याने होत असतो.
पश्चिम बंगाल निवडणुकीच्या निकालानंतर झालेल्या हिसेंवर कंगनाने केलेलं ट्विट भडकावू असल्याच्या मुद्दयावरून तिचे ट्वीटर अकाऊंट सस्पेंड केले आहे.त्यामुळे आपण कोरोना पॉझिटिव्ह असल्याची माहिती तिने इन्स्टाग्रामवर दिली आहे. तिने या पोस्टमध्ये असं म्हटलं आहे की, ‘गेल्या काही दिवसांपासून मला थकल्यासारखं आणि डोळ्यात जळजळ होण्यासह अशक्त वाटत होतं. हिमाचलला जाता येईल असं वाटत होतं म्हणून मी काल माझी चाचणी केली आणि आज मी कोव्हिड पॉझिटिव्ह आले आहे.