नवी दिल्ली ( वृत्तसंस्था ) ;- चीनच्या सिनोफार्म कोरोना लसीच्या आपत्कालीन वापराला जागतिक आरोग्य संघटनेने मंजुरी दिली आहे. सिनोफार्म ही चीनची पहिलीच कोरोना लस आहे, जिला या प्रकारची मंजुरी मिळाली आहे. या आधीच जवळपास 42 देशांत या लसीचा वापर केला जात असून या लसीद्वारे लाखो जणांचे लसीकरण करण्यात आले आहे.सिनोफार्म ही गैर-पाश्चिमात्य असणारी पहिलीच लस आहे की ज्याच्या वापराला जागतिक आरोग्य संघटनेने मंजुरी दिली आहे. या लसीच्या आपत्कालीन वापराला मंजुरी द्यायची की नाही यासाठी जागतिक आरोग्य संघनटेने एक समिती स्थापन केली होती.