जामनेर ( प्रतिनिधी ) ;- भारतीय जनता युवा मोर्चा जामनेर तालुका आयोजित भव्य रक्तदान शिबीर उत्साहात पार पडले. या शिबिराची सुरवात पं.दीनदयाल उपाध्यक्ष यांच्या प्रतिमा पूजन करून सुरवात करण्यात आली. या वेळी भारतीय युवा मोर्चा कार्यकर्त्यांनी मोठ्या उत्साहात रक्तदान केले तसेच इतर नागरिकांनी सुद्धा रक्तदान करून आपले योदान दिले या ठिकाणी रक्तदान शिबिरास प्रमुख उपस्थिती म्हणून मा.मंत्री गिरीश महाजन, आ.राजू मामा भोळे जि.प अध्यक्षा रंजना ताई पाटील ,प.स.अध्यक्ष जलाल तडवी यांची प्रमुख उपस्थिती होती . तसेच या ठिकाणी भाजप तालुकाअध्यक्ष .चंद्रकांत बाविस्कर नगरसेवक.जितेंद्र पाटील नगरसेवक महेंद्र बाविस्कर, नगरसेवक डॉ.प्रशांत भोंडे ,नगरसेवक धोंडू आप्पा पाटील, नगरसेवक बाबुराव हिवराळे, कैलास पालवे ,रविंद्र झाल्टे ,सुभाष पवार, आतिष झाल्टे, निलेश चव्हाण, यांच्यासह असंख्य भाजप कार्यकर्ते उपस्थित होते.








