जळगाव (प्रतिनिधी) – येथील टायगर ग्रुप खानदेशचे अध्यक्ष पै. ऋषिकेश भंडारकर यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिरांचे व माक्स वाटप आणि अन्नदान वाटप करण्यात आले. रक्तदान शिबीर हे रेड प्लस बँकच्या सहकार्याने आयोजित करण्यात आले.

टायगर ग्रुप भारतचे अध्यक्ष डॉ. तानाजी जाधव ,सागर कांबळे, यांच्या मार्गदर्शनाखाली रक्तदान शिबिर घेण्यात आले. यासोबत मास्कचे वाटप करण्यात आले. आयोजक गौरव उमप, सोपान मानकर ,ग्रामपंचायतचे सदस्य आनंद घुगे व मनोज बाविस्कर , अजय शिरसाठ, जितेंद्र निबाळकर, कुणाल बारी , शुभम सोनार, गणेश गोपाल , किरण चौधरी, विशाल पाटील, रवींद्र पाटील, प्रणव शर्मा आदींचे सहकार्य लाभले. रक्तदान शिबिरांचे रेड प्लस बँक यांच्या सौजन्याने आयोजित करण्यात आले होते. या शिबिराला डॉ. भरत गायकवाड आणि रक्तदाता विवेक महाजन हे उपस्थित होते.







