• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

रुग्णांच्या जीवाशी खेळणारा जीवघेणा प्रकार उघड…

रुग्णाची ऑक्सिजन लेव्हल १५ मात्र तातडीने हलविण्यासाठी असणारी रुग्णवाहिका ५ दिवसांपासून पंक्चर...

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
March 14, 2021
in जळगाव
0

४० रुग्णांसाठी केवळ २ कर्मचारी, अस्वच्छता व देखभाल बाबत यापूर्वीच तक्रार…

चाळीसगाव (प्रतिनिधी) – कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत चाळीसगाव हॉटस्पॉट बनत असताना लोकसहभागातून उभारण्यात आलेल्या कोविड सेंटर येथे रुग्णांची होणारी वाताहात व सेंटरची झालेली दुरावस्था आमदार मंगेश चव्हाण यांच्या सरप्राईज व्हिजिटने उघड झाली आहे.
काल दि.१३ मार्च रोजी रात्री चाळीसगाव येथील कोविड सेंटर येथून एका रुग्णाच्या तब्बेतीसंदर्भात पवार नामक व्यक्तीचा आमदार मंगेश चव्हाण यांना फोन आला असता रात्री साडेबारा वाजता आमदार चव्हाण हे कोविड सेंटर येथे दाखल झाले. त्यावेळी जे अतिशय विदारक असे चित्र कोविड सेंटरमध्ये दिसून आले त्याने रुग्णांशी सुरू असलेला जीवघेणा खेळ उघडकीस आला. राखुंडे नामक रुग्णाची ऑक्सिजन लेव्हल १५ वर आलेली असताना त्यांना हलवण्यासाठी शासनाने जी कार्डियाक रुग्णवाहिका उपलब्ध करून दिली आहे ती गेल्या ५ दिवसांपासून पंक्चर झालेली आढळली. शासन सदर कार्डियाक रुग्णवाहिकासाठी दरमहा भरमसाठ भाडे देत असताना सदर रुग्णाला साध्या व्हॅनमध्ये हलविण्यात येत होते.

तसेच त्यावेळी कोविड सेंटर येथे ४० हुन अधिक कोविड रुग्ण उपचार घेत असताना केवळ दोनच कर्मचारी त्याठिकाणी उपलब्ध असल्याचे आमदार मंगेश चव्हाण यांनी केलेल्या पाहणीत उघडकीस आले. आमदार मंगेश चव्हाण यांच्या पुढाकाराने मोठ्या दातृत्वभावनेने चाळीसगाव तालुक्यातील दानशूर व्यक्तींनी दिलेल्या ५० लाखांहून अधिक मदतीने हे कोविड रुग्णालय व त्यातील साहित्य उभे केले होते. मात्र त्यांची देखभाल दूरची बाब आहे जी जिवंत माणसे त्याठिकाणी उपचार घेत आहेत त्यांच्याकडे देखील लक्ष द्यायला कुणी नसल्याने आमदार चव्हाण यांनी संताप व्यक्त केला. आज कोविड येऊन एक वर्ष झाला तरी आपली आरोग्य व्यवस्था सुधारत नसेल तर शासन जो कोट्यवधीचा निधी खर्च करत आहे तो नेमका जातो कुठे हा प्रश्न निर्माण होतो. आमदार मंगेश चव्हाण यांनी मागील वर्षीच चाळीसगाव येथील कोविड सेंटर येथे जास्तीतजास्त कर्मचारी उपलब्ध करून द्यावे यासाठी जिल्हा प्रशासनाकडे पाठपुरावा केला होता मात्र त्याकडे त्यांनी दुर्लक्ष केले, तसेच येथील स्वच्छता व देखभाल बाबत अनेक तक्रारी प्राप्त झाल्याने आमदार मंगेश चव्हाण यांनी काही दिवसांपूर्वीच कोविड सेंटरला प्रत्यक्ष भेट देऊन व तसेच लेखी पत्र देऊन सूचना दिल्या होत्या. कोविड काळात आरोग्य यंत्रणेने चांगले काम केले याबाबत दुमत नाही मात्र लोकप्रतिनिधी यांच्या सूचनांची दखल घेतली जात नसेल तर मलाही लोकांच्या आरोग्यासाठी कठोर भूमिका घ्यावी लागेल असा इशारा देत जर प्रशासन व आरोग्य यंत्रणेच्या निष्काळजीपणामुळे एखाद्या रुग्णाचा जीव जाणार असेल तर यास संबंधित कोविड रुग्णालयाचे विभाग प्रमुख जबाबदार असून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी यासाठी मी आरोग्यमंत्री, पालकमंत्री, जिल्हाधिकारी, सिव्हील सर्जन यांच्याकडे तक्रार करणार असल्याचे आमदार चव्हाण यांनी सांगितले.


 

 

Previous Post

नवीन बियर बार, परमीट परवानासाठी 3 लाखाची मागणी!

Next Post

अखेर जामनेर शहरात 4 दिवसांचा जनता कर्फ्यु

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

अखेर जामनेर शहरात 4 दिवसांचा जनता कर्फ्यु

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

अपूर्ण घरकुले पूर्ण करण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांची थेट लाभार्थी भेट मोहीम
1xbet russia

अपूर्ण घरकुले पूर्ण करण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांची थेट लाभार्थी भेट मोहीम

June 17, 2026
विधान परिषद निवडणूक : महायुतीचे उमेदवार नंदकिशोर महाजन यांनी घेतली शिवसेना नगरसेवकांची सदिच्छा भेट
1xbet russia

विधान परिषद निवडणूक : महायुतीचे उमेदवार नंदकिशोर महाजन यांनी घेतली शिवसेना नगरसेवकांची सदिच्छा भेट

June 17, 2026
राजमाता जिजाऊ पुण्यतिथीनिमित्त अभिवादन
1xbet russia

राजमाता जिजाऊ पुण्यतिथीनिमित्त अभिवादन

June 17, 2026
गोदावरी संगीत महाविद्यालयात मृगोत्सव २०२६ चे आयोजन
1xbet russia

गोदावरी संगीत महाविद्यालयात मृगोत्सव २०२६ चे आयोजन

June 17, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

अपूर्ण घरकुले पूर्ण करण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांची थेट लाभार्थी भेट मोहीम

अपूर्ण घरकुले पूर्ण करण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांची थेट लाभार्थी भेट मोहीम

June 17, 2026
विधान परिषद निवडणूक : महायुतीचे उमेदवार नंदकिशोर महाजन यांनी घेतली शिवसेना नगरसेवकांची सदिच्छा भेट

विधान परिषद निवडणूक : महायुतीचे उमेदवार नंदकिशोर महाजन यांनी घेतली शिवसेना नगरसेवकांची सदिच्छा भेट

June 17, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon