• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

गृहमंत्री देशमुख, अशोक चव्हाण यांच्याविरोधात फडणवीसांची हक्कभंगाची नोटीस

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
March 10, 2021
in महाराष्ट्र
0

मुंबई (वृत्तसंस्था) – गृहमंत्री अनिल देशमुख यांनी “देवेंद्र फडणवीसांनी अन्वय नाईक प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला”, असा दावा विधानसभेत केला होता त्यामुळे गृहमंत्री देशमुख यांच्यासह मराठा आरक्षणावरून दिशाभूल करण्याचा आरोप करत माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्याविरोधातदेखील देवेंद्र फडणवीस यांनी हक्कभंगाची नोटीस दिली आहे.
अनिल अंबानी यांच्या अँटिलिया घराबाहेर स्फोटकं सापडल्याचं प्रकरण राज्याच्या राजकारणात चांगलंच तापू लागलं आहे. विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये या मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलीच खडाजंगी झाल्यानंतर आता हे प्रकरण हक्कभंगापर्यंत पोहोचलं आहे.

अँटिलियाच्या बाहेर जिलेटिनच्या कांड्या ठेवलेल्या स्कॉर्पिओ कार प्रकरणाची सध्या एनआयए चौकशी करत आहे. त्याचवेळी कारचा मालक मनसुख हिरेन याचा झालेला मृत्यू हत्या की आत्महत्या? या प्रकरणाचा तपास राज्यातली एटीएस करत आहे. एकाच प्रकरणाचा तपास करण्यासाठी केंद्रीय आणि राज्य पातळीवरच्या दोन संस्था गुंतल्या असल्यामुळे त्यावरून आता राजकारण रंगू लागलेलं दिसत आहे. त्यातच, या मुद्द्यावरून विधानसभेत गोंधळ झाल्यामुळे हे प्रकरण अधिकच तापलं आहे.

याबाबत विधान भवन येथे पत्रकारांशी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “गृहमंत्री अनिल देशमुख यांनी अन्वय नाईक प्रकरणात काल काही आरोप केले होते. सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणात स्वयंस्पष्ट अभिप्राय नोंदवले आहेत. त्यामुळे त्यांनी खोटे आरोप करून सुप्रीम कोर्टाचा सुद्धा अवमान केला आहे. प्रथमदर्शनी या प्रकरणात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा प्रकार दिसून येत नाही, असा सर्वोच्च न्यायालयाचा अभिप्राय आहे. त्यामुळे हे प्रकरण दडपण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही. शिवाय ही बाब आपण काल निदर्शनास आणून दिल्यानंतर सुद्धा ते वारंवार तेच बोलत राहिले. असे करून अनिल देशमुख यांनी माझ्या बोलण्यावर बंधने आणून माझा विशेषाधिकार भंग केला आहे. त्यामुळे त्यांच्यावर हक्कभंगाची कारवाई करावी, अशी मागणी मी सभागृहात केली आहे”.

अशोक चव्हाण यांच्याविरोधात देखील देवेंद्र फडणवीस यांनी हक्कभंगाची नोटीस बजावली आहे. “मराठा आरक्षणावर आज अशोक चव्हाण यांनी अतिशय दिशाभूल करणारे निवेदन सभागृहात केले. १०२ व्या घटनादुरुस्तीचा उल्लेख हा सर्वोच्च न्यायालयात मुकुल रोहतगी यांनी केला होता. केंद्र सरकारच्या वतीने अटर्नी जनरल यांनी जे सांगितले नाही, ते त्यांनी सभागृहात सांगितले. १०२ व्या घटनादुरुस्तीचा महाराष्ट्राच्या कायद्यावर परिणाम होणार नाही, हे उच्च न्यायालयाने आपल्या आदेशात स्पष्ट केले आहे. त्यावर २ पाने लिहिली आहेत. मात्र या सर्व बाबी विचारात न घेता अशोक चव्हाण महाराष्ट्राची आणि मराठा समाजाची दिशाभूल करताना स्वतःच्या अज्ञानाचे प्रदर्शन करीत आहेत”, असं देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले.


 

 

Previous Post

चोपड्यात इलेक्ट्रॉनिक दुकानाला आग ; लाखोंचे नुकसान

Next Post

खासदार डेलकर यांची आत्महत्या हा तर संसदेच्या प्रतिष्ठेला धक्का

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

खासदार डेलकर यांची आत्महत्या हा तर संसदेच्या प्रतिष्ठेला धक्का

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

कारची दुचाकीला धडक ,१२ वर्षीय मुलगा ठार ;तोंडापुरजवळील घटना
Uncategorized

जळगावात भरधाव रिक्षाच्या धडकेत १७ वर्षीय मुलगी गंभीर जखमी; अज्ञात चालकाविरुद्ध रामानंदनगर पोलिसांत गुन्हा दाखल

August 9, 2026
शहीदांचे बलिदान हा राष्ट्राच्या स्वाभिमानाचा अमूल्य ठेवा’ – पालकमंत्री गुलाबराव पाटील
Uncategorized

शहीदांचे बलिदान हा राष्ट्राच्या स्वाभिमानाचा अमूल्य ठेवा’ – पालकमंत्री गुलाबराव पाटील

August 9, 2026
भरधाव डंपरने धडक दिल्याने भुसावळच्या महिलेचा मृत्यू
1xbet russia

भडगाव शहरात मद्यधुंद पिकअप चालकाचा थरार; रस्त्यावरील वाहनांना धडक देऊन केले नुकसान, आरोपीवर गुन्हा दाखल

August 9, 2026
कोयत्यासह घरात घुसून दहशत; सात जणांविरुद्ध गंभीर गुन्हा
Uncategorized

कुऱ्हा येथे चालकानेच केला १ लाखाचा ट्रॅक्टर अन् ट्रॉली लांबवून विश्वासघात; भुसावळ तालुका पोलिसांत गुन्हा दाखल

August 9, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

कारची दुचाकीला धडक ,१२ वर्षीय मुलगा ठार ;तोंडापुरजवळील घटना

जळगावात भरधाव रिक्षाच्या धडकेत १७ वर्षीय मुलगी गंभीर जखमी; अज्ञात चालकाविरुद्ध रामानंदनगर पोलिसांत गुन्हा दाखल

August 9, 2026
शहीदांचे बलिदान हा राष्ट्राच्या स्वाभिमानाचा अमूल्य ठेवा’ – पालकमंत्री गुलाबराव पाटील

शहीदांचे बलिदान हा राष्ट्राच्या स्वाभिमानाचा अमूल्य ठेवा’ – पालकमंत्री गुलाबराव पाटील

August 9, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon