जळगाव(प्रतिनिधी) – शासनाचे 7/12 उताऱ्याचा सर्व्हर व्यवस्थीत चालत नसल्याने गेल्या महिनाभरापासून तलाठी बांधवाना मनस्ताप करावा लागत आहे.याबाबत वरिष्ठांना सांगून सुद्धा दुर्लक्ष केले जात असल्याने शेवटी तालुका तलाठी संघटनेच्या पदाधिकऱ्यानी निर्णय घेऊन तहसील कार्यालयात डिजीटल सिग्नेचर (डीएससी) जमा केले आहे.

यावेळी तहसीलदार यांना निवेदन देताना संदीप ढोबाळ ,रुपेश ठाकूर, सुधाकर पाटील,रमेश वंजारी, एम पी सोनवणे, भरत ननावरे, अनिता झाल्टे व तलाठी तसेच मंडळ अधिकारी कार्यालयचे पदाधिकारी उपस्थित होते.
निवेदनात म्हटले आहे की,जळगाव तालुका तलाठी संघाने दिनांक ३ रोजी दिलेल्या सर्व्हरच्या संथगती व अनियमीतच्या निषेदार्थ दि ५ रोजी जळगांव जिल्हा तलाठी संघाच्या पुढील आदेशा पर्यंत व साईड नियमीत सुरु होई पावेतो डी:एस.सी. तहसिल कार्यालयात जमा करण्यात आले आहे. सदर कामकाज बंद झाल्यानंतर शेतकाऱ्यांच्या होणाऱ्या गैरसोईस प्रशासन जबाबदार राहील असे निवेदनात म्हटले आहे.







