• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे ‘या’ ठिकाणी अद्ययावत हॉस्पिटल !

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
March 4, 2021
in जळगाव
0

जळगाव (प्रतिनिधी) – जळगाव जिल्हा रूग्णालयाच्या आवारात राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या अंतर्गत अद्ययावत माता व बालसंगोपन केंद्र (एमसीएच विंग) उभारण्यात येणार असून याला प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. राज्यातील १२ जिल्ह्यांमध्ये या प्रकारच्या केंद्रांना मंजुरी मिळाली असून यात जळगावचा समावेश आहे. तब्बल ३३ कोटी १५ लक्ष ९ हजार रूपयांची तरतूद असणार्‍या या केंद्रामुळे नवजात शिशूंसह मातांना अद्ययावत उपचार एकाच ठिकाणी मिळणार आहे. पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे या केंद्राला मंजुरी मिळाली असून याच्या कामांना लवकरच प्रारंभ करण्यात येणार आहे.

जळगाव जिल्हा रूग्णालयात सद्यस्थितीत नवजात शिशूंसह मातांच्या संगोपन व उपचाराची व्यवस्था असली तरी अद्याप येथे अत्याधुनीक उपचार उपलब्ध नव्हते. या बाबींची दखल घेत, राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगावचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी २०१८ मध्ये जिल्हा रूग्णालयाच्या आवारात राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या अंतर्गत भव्य माता व बालसंगोपन केंद्र उभारण्यात यावे यासाठी पत्र दिले होते. यानंतर ना. पाटील यांनी संबंधीत प्रकल्पाचा वेळोवेळी पाठपुरावा सुरू केला होता. तर यानंतर अलीकडेच जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नागोजीराव चव्हाण यांनी सुध्दा आरोग्य खात्याकडे मंजुरीसाठी प्रस्ताव सादर केला होता.

आज राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे अतिरिक्त अभियान संचालक डॉ. सतीश पवार यांनी राज्यातील १२ जिल्ह्यांमध्ये माता व बाल संगोपन केंद्राला (एमसीएच विंग) मंजुरी दिली असून यात जळगावचा समावेश असून अहमदनगर, नंदुरबार, नाशिक, अकोला, जालना, सातारा, गडचिरोली, लातूर, सांगली, कोल्हापूर, व सोलापूर या जिल्ह्यांचाही समावेश आहे. जळगाव साठी ३३ कोटी १५ लक्ष ९ हजार रूपयांची निधीस प्रशासकीय मंजुरी देण्यात आली आहे.

सध्याचे जिल्हा रुग्णालय हे जळगाव शहराचे मध्यवर्ती भागात असून रेल्वे स्टेशन एसटी स्टँड पासून हाकेच्या अंतरावर आहे. यामुळे जिल्हा रुग्णालय आकडे संदर्भित होणाऱ्या अत्यावश्यक माता व बालकांचे सोयीसाठी नवजात बालके आयसीयू वॉर्डमध्ये दाखल होणारे गंभीर रुग्ण इत्यादी यांना चांगल्या प्रकारे रुग्णालयीन सेवा उपलब्ध करून देण्यासाठी राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत जिल्हा रुग्णालयाच्या आवारात महिला व बाल रुग्णालय उपयुक्त ठरणार आहे.

राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या अंतर्गत उभारण्यात येणारे अद्ययावत माता व बालसंगोपन केंद्र (एमसीएच विंग) सिव्हील हॉस्पीटलच्या आवारातील अलीकडेच काढण्यात आलेली अतिक्रमणे व जुनी निवासस्थाने काढून रिक्त होणाऱ्या तब्बल सहा एकर जागेवर उभारण्यात येणार आहे. या तीन मजली केंद्रात माता आणि नवजात शिशूंवर अद्ययावत उपचार उपलब्ध राहणार आहेत.

या संदर्भात पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील म्हणाले की, एमसीएच विंगच्या माध्यमातून जिल्ह्यातील गोरगरीब महिला व त्यांच्या शिशूंना उत्तम दर्जाचे वैद्यकीय उपचार उपलब्ध होणार आहे. यासाठी निधीची कमतरता भासू देणार नसून लवकरच याच्या कामास प्रारंभ होणार असल्याची माहिती देखील ना. गुलाबराव पाटील यांनी दिली.


 

 

Previous Post

गंभीर गुन्हे असणार्‍या पैठणकर टोळीतील तिघांना एक वर्षासाठी हद्दपार

Next Post

या शुक्रवारपासून बेमुदत संपावर जाण्याची गाळेधारक घोषणा

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

या शुक्रवारपासून बेमुदत संपावर जाण्याची गाळेधारक घोषणा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शेतकऱ्यांच्या १७ पाणबुडी मोटार, ४ दुचाकी चोरांकडून हस्तगत
1xbet russia

भुसावळ येथील विवाह सोहळ्यातील दागिन्यांची चोरी उघड

March 5, 2026
‘जागतिक श्रवण दिन’ उत्साहात साजरा
1xbet russia

‘जागतिक श्रवण दिन’ उत्साहात साजरा

March 5, 2026
ग्रामसेवक संघटनेचे रावेर तालुका अध्यक्ष, सचिवाविरुद्ध ग्रामसेविकेची फिर्याद
1xbet russia

कृषी केंद्रातून ५० हजारांची रोकड लंपास

March 5, 2026
पारोळ्यातील वसंत जिभाऊनगरमधून युवकाकडून तलवार जप्त
1xbet russia

डॉक्टरांना अडवून मारहाण करीत १५ हजारांची लूट; न्यायालयाच्या आदेशाने तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

March 5, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

शेतकऱ्यांच्या १७ पाणबुडी मोटार, ४ दुचाकी चोरांकडून हस्तगत

भुसावळ येथील विवाह सोहळ्यातील दागिन्यांची चोरी उघड

March 5, 2026
‘जागतिक श्रवण दिन’ उत्साहात साजरा

‘जागतिक श्रवण दिन’ उत्साहात साजरा

March 5, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon