जामनेर ;- आज शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त जामनेर शहरात मोठ्या संख्येने शिवजयंती साजरी करण्यात आली. यात नगरपालिका चौक या ठिकाणी आ.गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. तसेच या ठिकाणी सर्व नगरसेवक सर्व शिव प्रेमी यांनी मोठया उत्साहात शिवजयंती साजरी केली. .सर्व शिवप्रेमी यांनी शासनाचे नियमानुसार तोंडाला मास लावून नियम पाळले तसेच जामनेर शहरात विविध ठिकाणी शिवाजी महाराजांचे प्रतिमा पूजन मोठया संख्येत करण्यात आले.
सोंबर्डीच्या पायथ्याशी भगवा रॅलीचे आयोजन करण्यात आले होते . या रॅलीमध्ये मोठया संख्येने तरुणाई मोठ्या संख्येने उपस्थित होते.








