• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

राष्ट्रवादीत काँग्रेसमध्ये येण्यासाठी शिवेंद्रसिंहराजे यांनी यू-टर्न घेतल्याचीही चर्चा

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
February 19, 2021
in महाराष्ट्र
0

मुंबई (वृत्तसंस्था) – भाजप आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी शशिकांत शिंदे आणि मी एकच असल्यामुळे कुणाला कुणीकडेही जाऊ दे, पण गावांचा आणि तालुक्याचा विकास करणे हा एकच आमचा उद्देश आहे. गरज असलेल्या महत्वाच्या गोष्टी कोणत्या आहेत. त्यास प्राधान्य दिले जाईल, असे वक्तव्य केल्यामुळे राजकीय वर्तुळात चलबिचल सुरू झाली असून, राष्ट्रवादीमध्ये शिवेंद्रसिंहराजे यांची घरवापसी होणार असल्याच्या चर्चेने सध्या साताऱ्यात जोर धरला आहे. राष्ट्रवादीत काँग्रेसमध्ये येण्यासाठी शिवेंद्रसिंहराजे यांनी यू-टर्न घेतल्याचीही चर्चा ही जिल्ह्यात आहे. शिवेंद्रसिंहराजे यांची सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीआधीच राष्ट्रवादीत घरवापसी होणार असल्याची चर्चा आहे.

मुंबईतील सरपंच परिषद या संघटना व जावळी तालुक्याच्या वतीने सरपंच व कोरोना योद्धा म्हणून उल्लेखनीय काम केलेल्या सरपंचांचा मेढा (ता जावळी) येथे सत्कार करण्यात आला. यावेळी शिवेंद्रसिंहराजे यांनी हे वक्तव्य केले. जावळी येथे शेतकरी मेळाव्यात साताऱ्याचे आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी आमदार शशिकांत शिंदे यांना जाहीर धमकी दिली होती. माझी वाट लागली तरी चालेल, माझे सर्व संपले तरी चालेल पण मी त्याचे सर्व संपवल्याशिवाय शांत राहणार नाही, अशा शब्दांत शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी आव्हान दिले होते.

मला माझ्या मागे कोणी त्रास द्यायचा प्रयत्न करत असेल, तर मी पण संपेन आणि समोरच्यालाही संपवणार ही आपली भूमिका आहे. आपला काटा जर कोणी काढत असेल तर मग काट्याने काटा काढायचा हीच आपली भूमिका स्पष्ट आहे. याबाबतीत मी पण मागे फिरणाऱ्यातील नाही. जर कोणी आडवेपणा करत असेल तर मी पण स्वभावाने आडवा माणूस आहे. मी कोणाला घाबरत नाही. शेवटी मी उदयनराजेंच्या विरोधात विधानसभा लढवून निवडून आलेला माणूस असल्याचेही शिवेंद्रसिंहराजे शशिकांत शिंदेंना उद्देशून म्हणाले होते.

शशिकांत शिंदे आणि शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यामध्ये जावळी तालुक्यातील राजकारणामुळे जुगलबंदी होत वाद विकोपाला गेले होते .यानंतर शशिकांत शिंदे यांनी माझ्यामध्ये व शिवेंद्रराजे यांच्यामध्ये कोणताही वाद नाही. आजही आम्ही एकत्र काम करत असल्याचे म्हटले होते. आम्ही सातारा जिल्हा बँकेची निवडणूक सर्वांना घेऊन बिनविरोध करणार असल्याचे शशिकांत शिंदे यांनी म्हटले आहे.

शिवेंद्रसिंहराजे सध्या जिल्हा बँकेचे अध्यक्ष आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शिवेंद्रसिंहराजे आल्यास सातारा पालिकेची निवडणूक त्यांच्या नेतृत्वाखाली लढवली जाईल, असेही शशिकांत शिंदे यांनी म्हटले आहे. त्याच दिवशी रात्री जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर व शिवेंद्रसिंहराजे यांच्यात सातारा विश्रामगृहात खलबते झाली होती.

रामराजेंची शिवेंद्रसिंहराजेंनी शिवरूपराजेंसोबत भेट घेतल्यानंतर राजकीय हालचाली गतिमान झाल्या असून, दुसऱ्या दिवशी बुधवारी (दि१७) मंत्रालयात शिवेंद्रसिंहराजेंनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली होती. मागील निवडणुकीनंतर कोण कुठे गेले आणि कोण कुठे गेले हे सर्वांना माहीत आहे, पण आम्ही दोघे आजही एकत्रच काम करत असल्याचे शिवेंद्रसिंहराजे यांनी म्हटल्यामुळेच सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीआधी शिवेंद्रसिंहराजे यांची घरवापसी होणार अशी अटकळ बांधली जात आहे.


 

 

Previous Post

बस मागे घेत असताना वृद्धा चाकाखाली आल्याने जागीच ठार

Next Post

जामनेरात शिवजयंती उत्सहात साजरी

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

जामनेरात शिवजयंती उत्सहात साजरी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

न्यायप्रविष्ठ प्रकरणांवर मुख्यमंत्र्यांना लवकरच सादर करणार माहिती
1xbet russia

न्यायप्रविष्ठ प्रकरणांवर मुख्यमंत्र्यांना लवकरच सादर करणार माहिती

April 23, 2026
चोपड्यात विनापरवाना अनधिकृत कापूस बियाण्यांचा साठा जप्त
1xbet russia

चोपड्यात विनापरवाना अनधिकृत कापूस बियाण्यांचा साठा जप्त

April 23, 2026
जागतिक पुस्तक दिन उत्साहात साजरा
1xbet russia

महिलेच्या पोटातून दीड किलोची गाठ काढण्यात यश

April 23, 2026
जागतिक पुस्तक दिन उत्साहात साजरा
1xbet russia

जागतिक पुस्तक दिन उत्साहात साजरा

April 23, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

न्यायप्रविष्ठ प्रकरणांवर मुख्यमंत्र्यांना लवकरच सादर करणार माहिती

न्यायप्रविष्ठ प्रकरणांवर मुख्यमंत्र्यांना लवकरच सादर करणार माहिती

April 23, 2026
चोपड्यात विनापरवाना अनधिकृत कापूस बियाण्यांचा साठा जप्त

चोपड्यात विनापरवाना अनधिकृत कापूस बियाण्यांचा साठा जप्त

April 23, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon