मुंबई (वृत्तसंस्था) – राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. ग्रामीण भागात कोरोनाचा फैलाव अधिक वाढत असल्याचे पाहायला मिळतं आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पावर यांनी वक्तव्य केलं आहे.

अकोला, अमरावती आणि यवतमाळ या शहरात लॉकडाऊन लागू शकतो, असं अजित पवार यांनी म्हटलं आहे. मुंबईपेक्षा जास्त रुग्णसंख्या अमरावतीत दिसत असल्याचंही अजित पवार म्हणाले आहेत. अजित पवार मुंबईत पत्रकारांशी बोलत होते.
अकोला, अमरावती, यवतमाळ या शहरात सध्या काय परिस्थिती आहे. याबाबत आज आढावा बैठक घेतली जाणार आहे. या बैठकीनंतर या तीन जिल्ह्याबाबत काय निर्णय घेतला जाणार हे समोर येईल, असं अजित पावर यांनी स्पष्ट केलं आहे. तसंच लॉकडाऊनबाबत अकोला, अमरावती आणि यवतमाळमधील कोरोना रोखण्यासाठी खबरदारी घेऊन निर्णय घेण्यात येणार असल्याचं अजित पवारांनी सांगितलं आहे.







