अमळनेर(प्रतिनिधी);- संपूर्ण भारत देशाच्या जनतेशी विश्वासघात करणाऱ्या केंद्र सरकारच्या विरोधात जळगाव युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष प्रा हितेशदादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अमळनेर येथील पेट्रोल पंपावर “सबके साथ विश्वासघात ” आंदोलन करण्यात आले. पेट्रोल, डिझेल, गॅस या सर्वच गोष्टी सामान्य माणसाच्या खर्चाच्या अदांजपत्रकाच्या अवाक्याबाहेरच्या असुन यांच्या किमती अशाच पद्धतीने वाढत राहील्या तर आपल्याला प्रवास सायकलीवरून करावा लागेल म्हणून यावेळी सायकलींची पुजा करत फुलहार घालण्यात आले तसेच गॅस सिलिंडरच्या बाबतीत असल्यामुळे चुलीला देखील यावेळी फुलहार घालुन निषेध व्यक्त करण्यात आला.
यावेळी युवक काँग्रेस चे विधानसभा अध्यक्ष महेश पाटील, शहराध्यक्ष तौसिफ तेली, शहरकार्याध्यक्ष कुणाल चौधरी, सचिव घनश्याम महाजन,मयुर पाटील,सरचिटणीस अतुल भागवत,मयुरेश पाटील अल्पसंख्याक सेल तालुकाध्यक्ष अलिम मुजावर, शहराध्यक्ष जुबेर पठाण, अझहर सय्यद, तालुकाउपाध्यक्ष राजु भाट, माजी युवक शहराध्यक्ष सईद तेली,अमळनेर काँग्रेस रेशनिंग अध्यक्ष मनोज बोरसे,काँग्रेसचे जेष्ठ नेते प्रविण जैन, काँग्रेस सरचिटणीस संतोष पाटील , शहरउपाध्यक्ष राजू शेख अहमद पठाण, सोशल मिडीया प्रमुख तुषार संदानशिव, राहुल गांधी विचारमंच अमळनेर अध्यक्ष फिरोज शेख, शब्बीर बोरा, प्रमोद पाटील, ऋषिराज सुर्यवंशी, मयुर पाटील , प्रमोद बडगुजर, शादाब तेली, रियाज भाई, राजु मैराळे, अब्दुल पठाण, बिलाल पठाण, शाहीद बागवान, समीर शेख, इरफान भाई,मोइन भाई, रिजवान भाई, कुणाल पाटील,रुपेश धनगर,नितीन पाटील, गिरिश माळी, एकनाथ पाटील, गणेश राजपुत, योगेश पाटील आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.








