मुंबई (प्रतिनिधी ) : – राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना विमान नाकारल्याने भाजपाचे नेतेमाजी मंत्री आ. गिरीश महाजन यांनी तीव्र नाराजी व्यक्त करून राज्य सरकारवर टीका केली आहे . यावेळी आ. गिरीश महाजन म्हणाले कि हा राजकारण करण्याचा प्रकार असून गोव्याला अधिवेशन तीन महिन्यांपूर्वीच ठरलेले होते. अशाप्रकारे राज्यपालानाचा अवमान करणे चुकीचे आहे . हा निंदनीय प्रकार आहे. अशी टीका आ. गिरीश महाजन यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना व्यक्त केली . विमान तयार आहे पायलट तयार आहे असे राज्यपाल तेथे गेले असता त्यांना २० -२५ मिनिटांनी त्यांना पुन्हा विमानातून उतरवून सांगतात कि परवानगी नाही . हे लोकशाहीला अनुसरून या गोष्टी नाही असेही आ. महाजन म्हणाले .

मसुरीला कार्यक्रमासाठी निघालेल्या राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी शासकीय विमानातून उतरवण्यात आल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. राज्यपाल आज शासकीय विमानाने देहरादूनला आणि इथून कारने मसुरीला जाणार होते. यासाठी शासकीय विमानाची बुकींग करण्यात आल्याचं राज्यभवनातील सूत्रांनी सांगितलं. मात्र राज्यपाल विमानतळावर जाऊन शासकीय विमानात बसल्यानंतर परवानगी नसल्याचं त्यांना सांगण्यात आलं. राज्यपाल त्यांनंतर दुपारच्या १२ वाजून १५ मिनिटाच्या स्पाईसजेटच्या विमानाने देहरादूनला रवाना झाले. मसुरीला IAS प्रशिक्षण समारोप कार्यक्रमासाठी राज्यपाल उद्या हजर राहणार आहेत. त्या कार्यक्रासाठी त्यांना शासकीय विमान हवे होते.







