जळगाव (प्रतिनिधी ) ;-बहिणाबाई चौधरी विद्यापीठातील ईगल सिक्युरिटी अँड पर्सनल सर्विसच्या सुरक्षा रक्षकांना बोनस,पीएफ यासह लिऊ वेजेस दिले नसल्याने त्याची तक्रार राष्ट्रवादी काँग्रेसचे महानगर सचिव कुणाल पवार यांनी नाशिकच्या कामगार उप आयुक्तांकडे केली होती . याप्रकरणाची दाखल घेत २ फेब्रुवारी रोजी ईगल सिक्युरिटी अँड पर्सनल सर्विसच्या निर्णय घेणाऱ्या अधिकाऱ्यांसह व कुलगुरूंना हजर राहण्याचे आदेश काढण्यात येऊन सर्व संबंधित कार्यालयीन कागदपत्र घेवून बोलवले आहे व न आल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे आदेश काढले आहेत. अशी माहिती कुणाल पवार यांनी दिली आहे.