जळगाव (प्रतिनिधी ) ;– देशाच्या ७२ व्या गणतंत्र दिवसाच्या निमित्ताने ‘सद रक्षनाय खलनिग्रहणाय’ हे ब्रीद वाक्य जपणाऱ्या जिल्हा पोलीस दल व रेड प्लस ब्लड बँक यांच्या संयुक्त विद्यमानाने पोलीस अधीक्षक कार्यालयातील मंगलम हॉल येथे महा रक्तदान शिबिराचे आयोजन केले.
रक्तदान शिबिराचे प्रसंगी कार्याध्यक्ष पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील उद्घाटक पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे , प्रमुख अतिथी आ. सुरेश दामु भोळे (राजू मामा) जिल्हाधिकारी अभिजित राउत ,सीईओ बी. एन.पाटील यांची उपस्थिती होती. मान्यवरांचे आभार सोबत रेड प्लस ब्लड बँक चे संचालक डॉ. मोईज देशपांडे, डॉ. भरत गायकवाड व डॉ . मिनाज पटेल, डॉ फारुख शेख. आदींनी सहकार्य केले. तसेच शिबिराचे आयोजक विवेक महाजन ,प्रकाश सपकाळ ,रवींद्र पाटील , मयूर बारी, रिजवान जहागीरदार, अख्तर अली सय्यद व समस्त जळगाव पोलीस दल* रक्तदान करण्यासाठी पुरुष पोलीस दल व महिला पोलिस दल मोठ्या संख्येने उपस्थित होते..








