• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

नागरिकांनी अधिक सतर्क राहून दक्षता नियमांचे पालन केले पाहिजे – अजित पवार

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
January 22, 2021
in महाराष्ट्र
0

पुणे (वृत्तसंस्था) – राज्यातील कोरोना बाधितांचा आकडा कमी होत असला तरीही संकट अद्याप टळलेले नसल्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये, यासाठी नागरिकांनी अधिक सतर्क राहून दक्षता नियमांचे पालन केले पाहिजे, असे आवाहन करतानाच कोरोनाची साखळी तोडण्यासाठी अधिकाधिक चाचण्या घेणे, तसेच बाधित व्यक्तींच्या निकट संपर्कातील व्यक्तींच्या लवकर चाचण्या करा, अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दिल्या. त्यांनी आज कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाबाबत सुरू असलेल्या कार्यवाहीबाबतही आढावा घेत कोरोना लसीकरण व्यवस्थापनात केंद्र शासनाच्या निर्देशाप्रमाणे कार्यवाही करावी, असे निर्देश दिले.

आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली पुण्यातील विधानभवन सभागृहात कोविड व्यवस्थापनाबाबत संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक घेण्यात आली. अजित पवार यांनी यावेळी बोलताना महत्त्वाच्या सूचना केल्या. पुणे शहर व जिल्ह्यात ‘कोरोना’ रुग्णसंख्या अजूनही पुरेशा प्रमाणात कमी झालेली नाही. ही चिंतेची बाब आहे. महाराष्ट्रात ब्रिटनहून जे प्रवासी आले आहेत त्यात नवीन स्ट्रेनचे काही कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यात परदेशातून आलेल्या नागरिकांबाबत माहिती घेऊन त्यांची तपासणी आणि चाचण्या करा, तसेच कोरोनाच्या बदलत्या स्वरूपाच्या पार्श्वभूमीवर अधिक सतर्क राहण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

रुग्णालय व्यवस्थापन, रुग्णोपचार व्यवस्थापन, प्रयोगशाळा तपासणी, कोविड सुविधा केंद्र, परदेशातून प्रवास करून आलेल्या नागरिकांबाबत शासनाच्या सूचना व त्याबाबची कार्यवाही, कोविड लसीकरणाबाबत सुरू असलेली कार्यवाही, कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली तसेच रुग्णालयीन व्यवस्थापन चोख असल्याचे सांगितले. बैठकीला विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, व्हिसीद्वारे राज्य उत्पादनशुल्क मंत्री दिलीप वळसे-पाटील, राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्यासह, पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मला पानसरे, खासदार वंदना चव्हाण, आमदार राहुल कुल, आमदार चेतन तुपे, आमदार सुनिल टिंगरे, आमदार अशोक पवार, आमदार सिद्धार्थ शिराळे यांच्यासह विविध पदाधिकारी तसेच विभागीय आयुक्त सौरभ राव व अन्य अधिकारी उपस्थित होते.

माध्यमांशी बोलताना अजित पवार यांनी नंतर आपण कोरोना लस कधी घेणार, या प्रश्नाचे उत्तर दिले. सुरुवातीला आरोग्य कर्मचारी-अधिकारी, पोलीस व अन्य फ्रंटलाइन वर्कर्सना लस देण्यात येत आहे. यात मी मोडत नसल्यामुळे जेव्हा कधी माझा नंबर येईल, तेव्हा मी लगेचच लस घेईन आणि तुम्हाला माहिती देईन, असे अजित पवार म्हणाले.


 

 

Previous Post

सीरम मधील दुर्घटनेचे सत्य चौकशीतून समोर येईल – मुख्यमंत्री

Next Post

मराठा प्रीमियर लीग 2021 क्रिकेट प्रतियोगीताचे उपउपांत्य फेरीच्या सामन्यांना उद्या पासून सुरवात

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

मराठा प्रीमियर लीग 2021 क्रिकेट प्रतियोगीताचे उपउपांत्य फेरीच्या सामन्यांना उद्या पासून सुरवात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शेताच्या बांधाच्या वादातून मारहाण; दोघांविरुद्ध गुन्हा
1xbet russia

शेताच्या बांधाच्या वादातून मारहाण; दोघांविरुद्ध गुन्हा

June 13, 2026
यावलमध्ये बालमजुरीचा पर्दाफाश
1xbet russia

यावलमध्ये बालमजुरीचा पर्दाफाश

June 13, 2026
चीर न देता लेझरद्वारे मूत्रपिंडातील खड्यांवर यशस्वी उपचार
1xbet russia

चीर न देता लेझरद्वारे मूत्रपिंडातील खड्यांवर यशस्वी उपचार

June 13, 2026
घरकाम करणाऱ्या महिलेनेच केला लाखोंच्या दागिन्यांवर डल्ला
1xbet russia

घरकाम करणाऱ्या महिलेनेच केला लाखोंच्या दागिन्यांवर डल्ला

June 13, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

शेताच्या बांधाच्या वादातून मारहाण; दोघांविरुद्ध गुन्हा

शेताच्या बांधाच्या वादातून मारहाण; दोघांविरुद्ध गुन्हा

June 13, 2026
यावलमध्ये बालमजुरीचा पर्दाफाश

यावलमध्ये बालमजुरीचा पर्दाफाश

June 13, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon