भुसाचल ;- एक वर्षाकरिता हद्दपार असलेला आरोपी नामे-अक्षय उर्फ भैंस की मुंडी कैलास बडगुजर वय-22 रा.अण्णा भाऊ नगर भुसावळ शहरा दिनांक 29 फेब्रुवारी 2020 रोजी 09.40 वाजता पोलीस निरीक्षक दिलीप भागवत यांना मिळलेल्या बातमी वरून टिंबर मार्केट परिसरात बेकायदेशीर रित्या प्रवेश करताना मिळुन आला असल्याने त्याचे विरुद्ध भाग 6 गुरन 0071/2029 महाराष्ट्र पोलीस अधिनियम-1951कलम-142 प्रमाणे गुन्हा दाखल करुन अटक करण्यात आली . आहे. सदरची कार्यवाही मा.पोलीस अधीक्षक डॉ..पंजाबराव उगले,अपर पोलीस अधीक्षक श्रीमती भाग्यश्री नवटके तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी गजाजन राठोड,.पोलीस निरीक्षक दिलीप भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली सहा.पो.निरी. अनिल मोरे, संदीप परदेशी,पो.ना.रविंद्र बिर्हाडे, रमण सुरळकर, महेश चौधरी, पो.कॉ.विकास सातदिवे,तुषार पाटील,ईश्वर भालेराव, प्रशांत परदेशी अशांनी केली.