चाळीसगाव प्रतिनिधी – तालुक्यातील बोरखेडा (पिराचे) येथील प्रगतिशील शेतकरी पुत्र व हल्लीं भडगाव रोड वैद्यकीय सेवा बजावत असलेले डॉ. डी. पी.पाटील यांची शरद जोशी विचारमंच शेतकरी संघटनेच्या जळगाव जिल्हा सरचिटणीस पदी नियुक्ती करण्यात आली आहे.

प्रदेशअध्यक्ष विठ्ठल पवार व दादासाहेब राजे हे केंद्र सरकारने तिन शेतकरी कृषी बिल कायदे लागु केलेले आहेत त्यासाठी शेतकरी सुरक्षा, शेतकरी विरोधी कायदे रद्द करावेत, एमएसपी, कृषी किंमत न्यायाधिकरणाची स्थापना करावी, कृषी मुल्य आयोगला संपुर्ण स्वायत्तता या व राष्ट्रव्यापी कृषीबील २०१९ जनजागृती अभियान यासाठी ऊत्तर महाराष्ट्र, खांदेश, मराठवाडा दौऱ्यावर आहेत.
कोविड१९ महामारीच्या संकटामध्ये संघटनेचे प्रदेशअध्यक्ष हे सतत १९१ व्या दिवशी आज औरंगाबाद, कन्नड, चाळीसगांव ते भडगांव, जळगाव जिल्हा दौऱ्यावर असताना बोरखेडे येथील शेतकरी व हल्लीं भडगाव तालुका येथील सामाजीक कार्यकर्ते शेतकरी डॉ. डी. पी. पाटील यांची शरदजोशी विचारमंच शेतकरी संघटना जळगाव जिल्हा सरचिटणीस पदी संघटनेचे नियुक्ती पत्र, झेंडा, स्मरणीका व संघटनेचा बिल्ला छातीला लावुन नियुक्ती करण्यात आली आहे, यावेळी संघटनेचे कार्यकर्त्यांनी दादासाहेब राजे यांचे पुष्पगुच्छ देऊन डॉ. डी.पी. पाटील यांनी संघटनेचे वतीने हार्दीक स्वागत केले.
यावेळी भडगाव येथे छोटेखानी कार्यक्रमात संघटनेचे प्रदेशअध्यक्ष विठ्ठल पवार राजे तथा दादासाहेब राजे पवार यांनी आज दि ८ जानेवारी २०२१ रोजी भडगांव येथे संघ़टेनेचे विवीध मान्यवर पदाधीकारी यांचे उपस्थितीत डॉ. डी पी पाटील यांची जळगाव जिल्हा सरचिटणीस पदी नियुक्ती केली.
यावेळी संघटनेच्या प्रदेश सचिव मालती प्र पाटील, डॉ महेंद्र काबरा राष्ट्रीय ऊपाध्यक्ष, डॉ गजेंद्र पाटील प्रदेश ऊपाध्यक्ष, हिरामण बांदल अध्यक्ष कामगार आघाडी, ऍड. विलास मोरे साहेब ऊपाध्यक्ष खांदेश विभाग, प्रमोद राठोड ऊपाध्यक्ष जलगाव जिल्हा, भडगांव तालुका अध्यक्ष शेखर भोसले, ऊपाध्यक्ष तुकाराम पाटील, व शेतकरी उपस्थित होते.
अशी माहीती संघटनेचे जळगाव जिल्हा प्रसिद्दी प्रमुख विकी खाकरे, व एरंडोल तालुका अध्यक्षा सौ आरती कुंदनसिंह ठाकुर यांनी दिली.
डॉक्टर डी पी पाटील यांचे चाळीसगाव,भडगाव तालुक्यातील शेतकऱ्यांकडून अभिनंदन होत आहे.







