चाळीसगाव प्रतिनिधी – शहरातील पोलीस स्टेशन जवळ असलेल्या चहाच्या हॉटेलवर चहा पित असतांना दि 8 रोजी सकाळी 11 वाजेच्या सुमारास भाजपच्या माजी नगरसेवकावर झालेल्या हल्याप्रकरणी माजी नगरसेविकेच्या पतीसह 3 जणांवर चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून मागील भांडणाच्या कारणावरून हा हल्ला झाल्याचे औरंगाबाद येथे उपचार सुरू असताना जखमीने दिलेल्या जवाबात म्हटले आहे.

भाजपचे माजी नगरसेवक प्रभाकर चौधरी रा चौधरी वाडा चाळीसगाव व माजी नागरसेविकेचे पती जगदीश जगन्नाथ महाजन रा नेताजी चौक चाळीसगाव यांच्यात मागील काळात हाणामारी होऊन परस्परविरोधी गुन्हे दाखल झाले होते या भांडणाच्या कारणावरून दि 8 रोजी सकाळी 11 वाजेच्या सुमारास प्रभाकर चौधरी व त्याचे मित्र हे पोलीस स्टेशन समोर असलेल्या चहाच्या हॉटेलमध्ये चहा पित असतांना आरोपी जगदीश महाजन, विशाल उर्फ दादू जगदीश महाजन व संजय घटी सर्व रा नेताजी चौक चाळीसगाव हे त्याठिकाणी येऊन प्रभाकर चौधरी यांना शिवीगाळ करून चापटा बुक्यांनी मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली व आरोपी जगदीश महाजन याने त्याच्या हातातील चाकु जीवे मारण्याचा प्रयत्न करून त्यांच्या पोटात मारून गंभीर जखमी केले जखमी अवस्थेत त्यांना शहरातील देवरे हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते मात्र त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने पुढील उपचारासाठी एम जी एम हॉस्पिटल औरंगाबाद येथे हलवले होते उपचार सुरू असताना दिलेल्या जवाबावरून चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला वरील तीन जणांवर गु र न 7/2021 कलम 307, 323, 504, 506, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून जखमी आरोपी जगदीश महाजन यास ताब्यात घेतले असून तपास पोलीस निरीक्षक विजयकुमार ठाकूरवाड यांच्या मार्गदर्शनाखाली स पो नि सचिन कापडणीस करीत आहेत.







