जळगाव (प्रतिनिधी) – लायन्स क्लब जळगाव सेन्ट्रल या संस्थेतर्फे जळगावातील मातोश्री आनंदाश्रम (वृद्धाश्रम) येथे लायन्स क्लब चे सदस्य अनिश चांदीवाल यांच्या वाढ दिवसाचे औचित्य साधून अन्नदान करण्यात आले. या कार्यक्रमा प्रसंगी अनिश चांदीवाल यांचे वडील सुभाष चांदीवाल, आई सौ.आशा चांदीवाल, सौ.रुची चांदीवाल लायन्स क्लब जळगाव सेन्ट्रल चे अध्यक्ष सी.ए जयेश ललवाणी सचिव अविनाश कक्कड, कोषाध्यक्ष दिनेश राका, सचिन राका, शैलेश गांधी, हे उपस्थित होते. अनिश चांदीवाल यांनी या प्रसंगी आनंद व्यक्त केला, मातोश्री आनंदाश्रम येथील वृद्धांनी लायन्स क्लब जळगाव सेन्ट्रल परिवाराचे आभार मानले .








