मुंबई (वृत्तसंस्था) – राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना युपीएचे अध्यक्ष करण्याची चर्चा रंगली होती. यावर प्रतिक्रिया देत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते संजय निरुपम यांनी धक्कादायक आरोप केला आहे.

संजय निरुपम यांनी काँग्रेसला संपवण्याचा मोठा कट सुरु असल्याचा गंभीर आरोप केला आहे. संजय निरुपम यांनी या संदर्भात एक ट्विट केलं आहे.
दिल्लीपासून मुंबईपर्यंत राहुल गांधींविरोधात एक मोहिम सुरु असून शरद पवार यांना युपीए अध्यक्ष करण्याची चर्चा हा त्याचाच एक भाग आहे, असं संजय निरुपम यांनी म्हटलं आहे.
याच मोहिमेअंतर्गत 23 स्वाक्षऱ्या असणारी चिठ्टी लिहिण्यात आली होती. यानंतर राहुल गांधींच्या नेतृत्वात सुसंगततेची कमतरता शोधण्यात आली. काँग्रेसला संपवण्याचा एक मोठा कट आहे, असंही निरूपम यांनी म्हटलंय.







