पाचोरा ;- श्री.गो.से.हायस्कूलची मार्च महिन्यानंतर आज 8 डिसेंबर पासून 9 महिन्यांनी शाळेची घंटा वाजली.
आज ८ डिसेंबर रोजी शासनाच्या सूचनेनुसार सकाळी नववी व दहावी वर्ग सुरू करण्यात आले. त्यावेळी विद्यार्थ्यांचे हात निर्जंतुक करून त्यांचे टेंपरेचर घेऊन एका वर्गात एका बेंचवर एक विद्यार्थी बसून शाळा सुरू करण्यात आली. विद्यार्थ्यांमध्ये शाळा सुरू झाल्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर जाणवला. नववी दहावी ला शिकविणारे सर्व शिक्षक बंधू-भगिनी उपस्थित होते. असेच शिक्षकेतर बंधू हजर होते.








