जामनेर (प्रतिनिधी) – उपरोक्त विषयान्वये आम्ही समस्त जामनेर तालुका चर्मकार समाज आपणास निवेदन सादर करतो की, पारोळा तालुक्यातील मौजे टोळी गावातील चर्मकार समाजाच्या २० वर्षीय मुलीचे अपहरण करून तिला कासोदा गावी नेत तिन नराधमांनी तिच्यावर अत्यावर करून तिला विष पाजुन जिवे ठार मारले आहे.
याप्रकरणाची जलद गती न्यायालयात चौकशी करण्यात येवुन न्यायालयात दोषी लोकांवर दोषारोपपत्र दाखल करण्यात येवुन जलद गतीने चौकशी करण्यात यावी. त्याचप्रमाणे सदरच्या तरूणीच्या आई-वडीलांची परिस्थिती गरीब असल्याने सदर पिडत कुटूंबास सरकारकडुन त्वरीत आर्थिक मदत व त्यांच्या जिवितास धोका होवु नये म्हणुन सुरक्षा मिळावी. त्याचप्रमाणे न्यायालयामध्ये फिर्यादी यांना सरकारतर्फे त्यांची बाजु मांडण्यासाठी विशेष सरकारी वकील उज्वळ निकम यांची नियुक्ती करून फिर्यादी आई – वडीलांना न्याय मिळावा व ओरोपींना कठोर फाशीची शिक्षा देण्यात यावी. तसेच आमच्या दलीत समाजावर वारंवार होत असलेल्या अशा प्रकारच्या घटनांना प्रतिबंध होण्याबाबतच्या उपाययोजना करण्यात येवुन प्रतिबंध व्हावा हि जामनेर तालुका चर्मकार समाज बांधवांची नम्र विनंती.








