नवी दिल्ली (वृत्तसंस्था) – अमेरिकेचे माजी राष्ट्रध्यक्ष बराक ओबामा यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा गोंधळलेले विद्यार्थी असा उल्लेख केला आहे. याची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे. नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला असून #माफ़ी_माँग_ओबामा हा हॅशटॅग ट्विटरवर ट्रेण्ड केला आहे.

बराक ओबामा यांचे ‘अ प्रॉमिसिड लँड’ या आत्मचरित्रासंदर्भात ‘न्यूयॉर्क टाईम्स’ने एक लेख लिहीला आहे. यामध्ये जगभरातील राजकीय नेत्यांव्यतिरिक्त इतर विषयांवरही बराक ओबामा यांनी भाष्य केले आहे.
आत्मचरित्रामध्ये राहुल गांधींबद्दल बराक ओबामा म्हणाले कि, राहुल गांधी एखाद्या घाबरलेल्या विद्यार्थ्यासारखे वाटतात, ज्याने संपूर्ण अभ्यासक्रम पूर्ण केला असून आपल्या शिक्षकांना प्रभावित करण्यासाठीही तयार आहे. मात्र कुठेतरी त्या विषयामध्ये प्राविण्य मिळवण्याची योग्यता तसेच चमक या विद्यार्थ्यामध्ये दिसत नाही, असे त्यांनी म्हंटले आहे.
यावर नेटकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली असून ओबामा यांनी राहुल यांच्याबद्दल असे शब्द कसे वापरले असा प्रश्न विचारत आहेत. तसेच #माफ़ी_माँग_ओबामा हा हॅशटॅग ट्विटरवर ट्रेण्ड होत आहे. तर काहींनी यावरून राहुल गांधींना ट्रोलही केले आहे.







