जळगाव (प्रतिनिधी) – जळगाव जिल्हा युवा शारीरिक शिक्षण व क्रीडाशिक्षक महासंघाची सभा जळगांव जिल्हा शारीरिक शिक्षण व क्रीडाशिक्षक महासंघ अध्यक्ष डॉ. प्रदीप तळवलकर यांचा अध्येक्षतेखाली महाराष्ट्र राज्य शारीरिक शिक्षण व क्रीडाशिक्षक महासंघाचे वरिष्ठ सचिव राजेश जाधव यांचे उपस्थितीत नुकतीच
सभा सभा पार पडली. या सभेत जळगांव जिल्हा शारीरिक शिक्षण व क्रीडाशिक्षक महासंघ संलग्नित जळगाव जिल्हा युवा शारीरिक शिक्षण व क्रीडाशिक्षक महासंघाची कार्यकारणी निवड करण्यात आली.
जिल्हा युवा कार्यकारणी या प्रमाणे – अध्यक्षपदी डॉ. रणजित शामराव पाटील तर सचिवपदी प्रा. हरीश शेळके, उपाध्यक्ष सुनील प्रभाकर वाघ (अमळनेर) व प्रा.समीर विष्णू घोडेस्वार (जामनेर), कार्याध्यक्ष सचिन रमेश महाजन (एरडोल), सहसचिव प्रा. गिरीश युवराज पाटील (पाचोरा ) व प्रा. वसिम बेग, खजिनदार जितेन्द्र अर्जुन फिरके (यावल), संघटक – मेघश्याम शिंदे (भुसावळ), डॉ. सचिन मालोजीराव भोसले (भडगांव), डॉ. कांचन अमोल विसपुते (जळगांव), सल्लागार राहुल सुभाष साळुंखे (चाळीसगाव), देविदास हिरामण महाजन (चोपडा), कार्यकारणी सदस्य – युवराज पद्माकर माळी (रावेर), संतोष जनार्दन उगले (मुक्ताईनगर), संदेश हिरामण महानुभाव (धरणगाव),विजयकुमार रामदास चौधरी(बोदवड), विलास सुकलाल पाटील (भुसावळ), संदीप हिरामण पवार (पारोळा), नितीन वसंत पाटील (जळगांव) यांची निवड करण्यात आली.
नूतन कार्यकारणीचे माजी आ.प्रा. चंद्रकांत सोनवणे, जिल्हा क्रीडाशिक्षक महासंघाचे पदाधिकारी प्रशांत जगताप,प्रवीण पाटील, प्रशांत कोल्हे, डी.व्ही.चौधरी, उतर महाराष्ट्र विद्यापीठाचे क्रीडा संचालक डॉ. दिनेश पाटील, जिल्हा क्रीडा अधिकारी मिलिंद दिक्षित, मनपा क्रीडा अधिकारी चंद्रकांत वांद्रे आदींनी अभिनंदन केले.









