उत्तर प्रदेश (वृत्तसंस्था) – उत्तर प्रदेशातील गोंडा जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. या ठिकाणी तीन बहिणींवर अॅसिड फेकण्यात आलं आहे.

गोंडा जिल्ह्यातील पक्का गावात ही घटना घडलीये. एका तरुणाने झोपेत असलेल्या तीन बहिणींवर अॅसिड हल्ला केला आहे. गोंडा पोलीस या संपूर्ण घटनेची चौकशी करत आहेत.
या हल्ल्यात मोठी बहीण गंभीररीत्या जखमी झालीये. तर दोन बहिणी किरकोळ जखम झाली आहे. तिन्ही बहिणींना तात्काळ जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून उपचार सुरु आहेत.







