मुक्ताईनगर (प्रतिनिधी) – मुक्ताईनगर तालुक्यातील कोथळी या गावी राज्यभरातील सर्व धार्मिक स्थळे आणि देवस्थानने उघडावीत यासाठी मुक्ताबाई मंदिरामध्ये आंदोलन करण्यात आले. यावेळी भाजपाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सरकारचा निषेध करीत तात्काळ देवस्थाने उघडावीत अशी मागणी केली.

जगभरात पसरलेल्या कोरोना विषाणूचा धोक्यामुळे संपूर्ण देश लोक डाऊन होते. मात्र अनलोक प्रक्रिया सुरू झाल्यानंतर आता दुकाने शासकीय कार्यालय वाहने याचबरोबर दारूची दुकाने आणि हॉटेल देखील उघडण्यात आले आहे. मात्र अद्यापही बंद आहेत हे धार्मिक स्थळे व देवस्थाने उघडावीत यासाठी भारतीय जनता पक्षातर्फे मंगळवारी 13 ऑक्टोंबर रोजी मुक्ताईनगर तालुक्यातील कोथळी गावी संत मुक्ताबाई मंदिर आवारात आंदोलन करण्यात आले. यावेळी खासदार रक्षाताई खडसे, बेटी बचाव बेटी पढाव योजनेचे राष्ट्रीय संयोजक डॉ. राजेंद्र फडके, तालुकाध्यक्ष रामभाऊ पाटील, नगराध्यक्ष नजमा तडवी, माजी सभापती राजू माळी, उपनगराध्यक्ष मनीषा पाटील, तालुका सरचिटणीस चंद्रकांत भोलाणे, शिवराज पाटील, प्रवीण पाटील, वासुदेव बढे, विजय भंगाळे, प्रेमचंद बढे, भैया पाटील जितेंद्र पाटील, बापू ससाणे, सुभाष पाटील आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.








