जामनेर (प्रतिनिधी)- तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वडाळी दिगर येथे “शिक्षक आपल्या दारी” हा उपक्रम राबविला जात आहे.उपक्रमाबाबत माहिती देताना शिक्षक संदिप मधुसूदन पाटील यांनी सांगितले की,सद्या कोरोना महामारीमुळे सर्वत्र शाळा बंद आहेत.



ऑनलाईन पद्धतीने विद्यार्थ्यांचे शिक्षण सुरु आहे मात्र ज्या पालकांकडे अँड्रॉइड मोबाईल नाहीत ते विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये त्यांच्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक योगेश काळे यांच्या योजनानुसार,शिक्षक निलेश भामरे यांच्या सहकार्याने प्रत्यक्ष त्या विद्यार्थ्यांच्या घरी शाळेचे शिक्षक भेट देत असून फिजिकल डिस्टन्स,मास्क,सॅनिटायझर इत्यादी कोरोना बाबतची आवश्यक ती सर्व काळजी घेत विद्यार्थ्यांच्या अभ्यासाबाबत पालकांची भेट घेणे,विचारपूस करणे,विद्यार्थ्यांना गृहपाठ देणे, अभ्यास सरावासाठी अभ्यासिका देणे,काही घटक समजण्यास अडचण असल्यास तो समजावून सांगणे या प्रकारे ‘शिक्षक आपल्या दारी’ या उपक्रमात अध्ययन अध्यापन कार्य सुरु आहे.ऑनलाईन ऑफलाईन या दोन्ही पध्द्तीने शाळा बंद पण शिक्षण प्रक्रिया सुरू आहे.उपक्रमासाठी गटशिक्षणाधिकारी विजय सरोदे,केंद्रप्रमुख रामचंद्र वानखेडे यांचे मार्गदर्शन लाभत आहे.







