• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

जळगाव जिल्हा कोविड रुग्णालयात प्रोढाची आत्महत्या; रूग्णालयाचा हलगर्जीपणा- नातेवाईकांचा आरोप

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
September 11, 2020
in जळगाव
0

जळगावात (प्रतिनिधी) – जिल्हा कोविड रुग्णालयात 50 वर्षीय पौढाची गळफास घेत आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार शुक्रवारी समोर आला. आत्महत्या करणारी व्यक्ती जामनेर तालुक्यातील पहूर येथील रहिवासी आहे. रुग्णालयातील वॉर्ड क्रमांक 6 मध्ये गुरुवारी मध्यरात्रीनंतर एक वाजेच्या सुमारास त्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. मात्र याबाबत नातेवाईकांना शुक्रवारी पहाटे 4.30 वाजता भ्रमणध्वनीद्वारे कळविल्याने जिल्हा रूग्णालयातील प्रशासनाचा हलगर्जीपणा असल्याचा आरोप मयताच्या नातेवाईकांनी केला आहे.

पहुर येथील कडुबा नकुल घोंगडे (वय 50) यांची काही दिवसांपूर्वी प्रकृती बिघडली होती. त्यांना श्वास घेण्यास त्रास होत असल्याने पहूर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्याठिकाणी खबरदारी म्हणून त्यांची कोरोनासाठी अँटीजेन चाचणी करण्यात आली होती. या चाचणीचा अहवाल निगेटिव्ह आला होता. परंतु, त्रास जाणवत असल्याने त्यांना कोरोनाच्या आरटीपीसीआर चाचणीसाठी दि. 9 सप्टेंबर रोजी त्यांना पहुरच्या ग्रामीण रुग्णालयातून जळगाव येथील जिल्हा कोविड रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर वॉर्ड क्रमांक 6 मध्ये उपचार सुरू होते. दि.10 सप्टेंबर रोजी त्यांचे आरटीपीसीआर चाचणीसाठी स्वॅब घेण्यात आले होते. मात्र, त्यांचा अहवाल प्राप्त होण्यापूर्वीच त्यांनी गुरुवारी मध्यरात्रीनंतर गळफास घेत आत्महत्या केली. त्यांच्या आत्महत्येचे कारण स्पष्ट झालेले नाही. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद काय म्हणाले या घटनेसंदर्भात जिल्हा कोविड रुग्णालयाचे अधिष्ठता डॉ. जयप्रकाश रामानंद यांच्याशी बोलले असता त्यांनी सांगितले की, त्यांनी सांगितले की,संबंधित रुग्णास 9 सप्टेंबर रोजी कोविड रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. 10 सप्टेंबर रोजी त्यांचा आरटीपीसीआर चाचणीसाठी स्वॅब घेतले होते. गुरुवारी रात्री रूग्णाने उशिरापर्यंत जेवण घेतले नव्हते. वॉर्ड क्रमांक 6 मधील वैद्यकीय नर्स ने त्यांना जेवण आणि औषधे घेण्यासाठी विनंती करत होते. पण त्यांनी उशिरापर्यंत प्रतिसाद दिला नाही. त्यानंतर वेळ झाल्याने नर्सने त्यांना झोपण्याची विनंती केली. नंतर नर्स त्यांच्या खोलीत गेल्या. पुन्हा रात्री 12.30 वाजेच्या सुमारास नर्स राऊंडला गेल्या असता रुग्ण बेडवर नव्हता. म्हणून त्यांनी इतरत्र शोधाशोध केली. तरीही रुग्ण सापडत नसल्याने नर्सने डॉक्टरांना माहिती दिली. तेव्हा सर्वांनी धाव घेऊन पाहणी केली असता, वॉर्ड क्रमांक 6 च्या बाजूच्या खोली जवळ असलेल्या एका प्लायवूडच्या पट्टीला बागायती रूमालाने गळफास घेऊन रूग्णाने आत्महत्या केल्याची घटना समोर आली. या घटनेनंतर मला रात्री डॉक्टरांनी भ्रमणध्वनी कळवले. मी तात्काळ घटनास्थळी दाखल झालो. नंतर आम्ही पोलिसांना घटनेची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला, याप्रकरणी प्रशासकीय चौकशी समिती गठित करण्यात येणार असून त्यात डॉ.पोटे, अरूण कासोटे, वैद्यकीय अधिकारी इम्रान पठाण यांच्यामार्फत सखोल चौकशी करण्यात येणार असल्याची माहिती डॉ. जयप्रकाश रामानंद यांनी केसरीराजशी बोलताना दिली.

जिल्हा रूग्णालयातील प्रशासनाचा हलगर्जीपणा

– नातेवाईकांचा आरोप

आमच्या रूग्णाला पहूर येथे किडनीचा आजार असल्याने त्याला जळगाव जिल्हा कोविड रूग्णालयात उपचारासाठी वार्ड क्र.6 मध्ये दाखल केले असता आम्हाला रूग्णाला जवळ थांबू दिले नाही.शुक्रवारी पहाटे 1 वाजता आत्महत्या केली असता आम्हाला पहाटे 4.30 वाजता कळाले. शासकीय जिल्हा कोविड रूग्णालयातील रात्रीचे कर्मचारी यांनी लक्ष दिले असते तर आमच्या रूग्णाने आत्महत्या केली नसती यावरून जिल्हा रूग्णालयातील प्रशासनाचा हलगर्जीपणा दिसून आल्याचा आरोप मयताचा मुलगा गणेश कडूबा घोंगडे व रामचंद्र नकुल घोंगडे यांनी केला आहे.


 

 

Previous Post

चीनचा पँगाँगमध्ये फिंगर तीनच्या दिशेने मोर्चा

Next Post

PF खातेदारांना 8.5% व्याज आता हप्त्यांऐवजी मिळू शकते एकरकमी

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

PF खातेदारांना 8.5% व्याज आता हप्त्यांऐवजी मिळू शकते एकरकमी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

गस्तीवरील पोलिसांची कामगिरी : गोडाऊनमध्ये चोरी करणाऱ्या तिघांना रंगेहाथ अटक
1xbet russia

पाचोरा येथील गोडाऊनमधून तीन एसी चोरीला

April 17, 2026
क्रिकेट फिव्हर ऑन.. जळगाव क्रिकेट लिगचा रोमहर्षक संग्राम
जैन कंपनी

क्रिकेट फिव्हर ऑन.. जळगाव क्रिकेट लिगचा रोमहर्षक संग्राम

April 17, 2026
डॉ.उल्हास पाटील वैद्यकिय महाविद्यालयात टीचर्स ज्युनिअर नाईट उत्साहात
1xbet russia

डॉ.उल्हास पाटील वैद्यकिय महाविद्यालयात टीचर्स ज्युनिअर नाईट उत्साहात

April 17, 2026
दुखावर मात करीत आदिनाथने मिळवले ८० टक्के
1xbet russia

खेळाची आवड जोपासत रजत संतोष जैन १० यश

April 17, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

गस्तीवरील पोलिसांची कामगिरी : गोडाऊनमध्ये चोरी करणाऱ्या तिघांना रंगेहाथ अटक

पाचोरा येथील गोडाऊनमधून तीन एसी चोरीला

April 17, 2026
क्रिकेट फिव्हर ऑन.. जळगाव क्रिकेट लिगचा रोमहर्षक संग्राम

क्रिकेट फिव्हर ऑन.. जळगाव क्रिकेट लिगचा रोमहर्षक संग्राम

April 17, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon